'रेल्वेस्थानकांचा दर्जा वाढवण्यासाठी हवे सूक्ष्म नियोजन '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

कोल्हापूर - रेल्वे हे सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्वाचे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकांचा दर्जा वाढणे, स्वच्छता राखणे, रेल्वे ट्रॅकची संख्या वाढणे या बाबी आवश्‍यक असून त्यासाठी सुक्ष्म आराखडा व योग्य नियोजन आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेसेवेची 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्याहस्ते विशेष पोस्ट कव्हर प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, पुणे मंडळ रेल्वेचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, कृष्णात पाटील, पोस्टाचे आर. एस.

कोल्हापूर - रेल्वे हे सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्वाचे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकांचा दर्जा वाढणे, स्वच्छता राखणे, रेल्वे ट्रॅकची संख्या वाढणे या बाबी आवश्‍यक असून त्यासाठी सुक्ष्म आराखडा व योग्य नियोजन आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेसेवेची 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्याहस्ते विशेष पोस्ट कव्हर प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, पुणे मंडळ रेल्वेचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, कृष्णात पाटील, पोस्टाचे आर. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. 

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ""उत्कृष्ट नियोजन व अंदाजपत्रकाचे काटेकोर पालन यामुळे कामे दर्जेदार व वेळेत होवू शकतात, हे राजर्षी शाहू महाराजांच्या दुरदर्शीपणातून उभारलेल्या अनेक बाबींमधून दिसून येते. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनर्स कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे त्यापैकीच एक उत्तम उदाहरण आहे. कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा हेरिटेज ढाचा सांभाळून विकास करावा. सुक्ष्म आराखडा करुन रेल्वेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी गती द्यावी.'' 

खासदार संभाजीराजे म्हणाले, ""राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने असलेले कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे केवळ हेरिटेज म्हणून न राहता ते हायटेक करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. या ठिकाणी दर्जेदार संग्रहालय व्हावे. 125 वर्षेपूर्तीनिमित्त दर्जेदार कॉफीटेबल बुक तयार करा.'' या वेळी त्यांनी कोल्हापूर ते पुणे जलदगती रेल्वे लवकर सुरु करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ""125 वर्ष जुने असलेल्या या रेल्वे स्टेशनला व्हीटी स्टेशनप्रमाणे मेकओव्हर होणे आवश्‍यक आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये 17 ते 18 कोटींची विकासकामे रेल्वे स्टेशनसंबंधी मंजूर करुन आणली. यामध्ये प्लॅटफॉर्मची उंची वाढणे, शेल्टरशेड, टिकीट वेंडिंग मशिन, फुट ओव्हर ब्रिज यांचा समावेश आहे.'' 

आर. एस. पाटील यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. पुणे मंडळाचे व्यवस्थापक दादाभॉय यांनी या पोस्टर कव्हरमुळे राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनची ओळख देशपातळीवर निर्माण होईल, असे प्रास्ताविकात सांगितले. 

Web Title: Micro Planning To Increase Level Of Railway Locations