कंपन्यांकडून बचत गट महिलांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

दुधोंडी : परिसरात महिला बचत गटांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या खासगी कंपनी संदर्भात लवकरच पलूस तहसीलदारांकडे तक्रार देणार आहे, अशी माहिती आर. पी. आय.चे पलूस तालुका युवा संघटनेचे अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी दिली.

ते म्हणाले,""मायक्रोफायनान्ससारख्या जवळ पास चार-पाच खासगी कंपन्यांद्वारे दुधोंडीसह पलूस तालुक्‍यातील गावांना महिला बचत गटांच्या नावाखाली कर्ज देण्यात येते. त्यावर मोठ्या व्याजासह आकारणी करण्यात येते. कर्ज न भरणाऱ्या गरीब महिलांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या त्रासाला सहन करावे लागत असल्याने महिलांत भीतीचे वातावरण आहे. सध्या 500 व 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने सगळीकडे पैशांची चणचण निर्माण झाली आहे.

गरीब महिलांना रोजगारही मिळत नसल्याने रोजी-रोटी चालवणे जिकिरीचे झाले असताना बचत गटांच्या माध्यमातून महिलांना कर्ज दिलेल्या खासगी कंपनीकडून त्रास सहन करावा लागत आहे. कर्ज न भरणाऱ्या महिलांना कंपनी कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केली जात आहे. या संदर्भात गरीब महिलांच्यावतीने आर. पी. आय. युवकचे अध्यक्ष विशाल तिरमारे म्हणाले,""महिलांनी कुठलेही कर्ज भरू नये. लवकरच या कंपन्यांविरोधात तहसीलदारांसह पोलिसांकडे तक्रार देणार आहे.''

Web Title: microfinance companies decieve women

टॅग्स