सामान्यांचे बजेट कोलमडले

तात्या लांडगे
शनिवार, 26 मे 2018

सोलापूर - सर्वसामान्यांचे सरकार म्हणून केंद्रातील सरकारला निवडणुकीत मतदान केले खरे, मात्र याच मध्यमवर्गीय मतदारांचे सध्या इंधन दरवाढ, जीएसटी, रेरा कायद्यामुळे कंबरडे मोडले आहे. वाळूच मिळत नसल्याने राज्यातील सुमारे 13 लाख मजुरांच्या हाताला काम नाही. वाळूसह लोखंड, सिमेंट, विटा, फरशी आदी वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने आमच्या स्वप्नातील घर पूर्ण होईल की नाही, याची सर्वसामान्यांना चिंता लागली आहे.

जीएसटी व रेरा कायदा चांगला असूनही त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती झालेली नाही. त्याची सर्वसामान्यांना आजही भीती वाटते. बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक सध्या कमी झाली असून, या व्यवसायावर मंदीचे सावट असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

सध्या सर्वत्र वाळूअभावी कित्येक बांधकामे जागच्याजागी ठप्प आहेत. महागाईमुळे स्वतःच्या पैशातून घर बांधणाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बांधकामाचे दर आता प्रतिस्क्‍वेअर 900 ते 1200 रुपयांनी वाढले आहेत.
- पिरेश मरतूरकर, बांधकामधारक

Web Title: middle class people budget colapse