आटपाडी तालुक्यातील झरे परिसरातील शेळ्या-मेंढ्यांचे स्थलांतर 

आटपाडी तालुक्यातील झरे परिसरातील शेळ्या-मेंढ्यांचे स्थलांतर 

झरे - आटपाडी तालुक्यातील झरे परिसरात भीषण चारा टंचाई भासू लागली आहे. लहान जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न आहे. मोठी जनावरे उसाचे वाढे घेऊन जगवतात. पण लहान जनावरांना (शेळ्या-मेंढ्याना) चारा आणायचा कुठून हा मोठा प्रश्न आहे. चारा विकत घेऊन तो परवडत नाही.

जोपर्यंत मोठा पाऊस पडत नाही, तोपर्यंत कऱ्हाड, कडेगाव, पाटण खोरे, चिपळूण, पंढरपूर, भूम, परांडा या भागात मेंढ्या जगवण्यासाठी घेऊन जातात. जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यावर परत आपापल्या गावी येतात.

झरे परिसरात पाच गावांना पाऊस झाला नाही. पाण्याची कायमस्वरूपी कोणतीही योजना नाही. वर्षानुवर्षे मेंढ्या जगवण्यासाठी जावे लागत आहे, हे थांबणार कधी, या विवंचनेत मेंढपाळ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com