"नजरे'च्या धाकाने उद्यानही केले "बोलके' 

राजेंद्र होळकर - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

इचलकरंजी - पोलिस म्हटले की वर्दीचा धाक. त्यांच्या भेदक नजरेतून गुन्हेगार "बोलते' होतात. तीच नजर पर्यावरणाप्रती संवेदनशील झाली तर काय होऊ शकते, याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे थोरात चौकातील पोलिस वसाहतीमधील फुलविलेले मिलिंद उद्यान. पडीक जागेला "शिस्त' लावताना फुलझाडांची लागवड करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा परिसर जणू "बोलका' केला. 

थोरात चौकामध्ये पोलिस कॉलनी परिसरातील पडीक जागेवर सोळा वर्षांपूर्वी तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक मिलिंद भारंबे यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून बहुउद्देशीय सभागृह, क्रीडा संकुल व मिलिंद उद्यान उभारले. तत्कालीन पोलिस अधीक्षक आर. के. पद्‌मनाभन व तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते आणि श्री. भारंबे यांच्या उपस्थितीत 16 मे 2001 ला उद्‌घाटन झाले. काही दिवसांत श्री. भारंबे यांची बदली झाली. त्यानंतर उद्यान दुरवस्थेच्या विळख्यात सापडले. उद्यानमधील फुलझाडांबरोबरच काही फळांची झाडे, हिरवळीची जागा खुरट्या झुडपांनी घेतल्याने "मिलिंद' उद्यान नावालाच राहिले होते. 

श्री. भारंबे सध्या उच्च पदावर आहेत. उद्यानाची पुनर्निर्मिती करण्याचा निर्णय येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी घेतला. त्याला परिश्रमाची जोड देत श्री. डोके यांनी "मिलिंद' उद्यान "बोलके' केले. 

बागेचे उद्‌घाटन आमदार सुरेश हाळवणकर व अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, गावभागचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे, शिवाजीनगरचे सतीश पवार, शहापूरचे सीताराम डुबल, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अरुण पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, नगरसेवक तानाजी पोवार, अजितमामा जाधव आदी उपस्थित होते. 

कौतुकास्पद काम 
खाकी वर्दीची नोकरी म्हणजे तणाव व कटकटीची समजली जाते. तणाव घेऊन काम करतानाही येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांच्या शाखेच्या पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने थोरात चौकातील पोलिस वसाहत परिसरात उद्यानाची पुनर्निर्मिती करून उद्यान फुलविले आहे. हे काम खरोखरंच कौतुकास्पद आहे, असे मत मिलिंद उद्यानाच्या उद्‌घाटन समारंभावेळी बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Milind garden blossomed due to police