दुध आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे... (व्हिडिओ)

हेमंत पवार
सोमवार, 16 जुलै 2018

कऱ्हाड (सातारा): शेतकऱ्यांना दुध दरवाढ मिळालीच पाहिजे... दुध आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे..., शेतऱ्यांना घामाचे दाम मिळालेच पाहिजे... पाकिस्तानातून साखर आयात करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या ना अशा अनेक घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (सोमवार) येथील कृष्णाबाई मंदिरासमोर आणि जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस दुग्धाभिषेक घालून दूध दर आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला पाच रुपये दरवाढ मिळावी या मागणीसाठी खासदार राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शाखाली आजपासुन दुध आंदोलनास प्रारंभ करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ व पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणाविरोधी जोरदार घोषणाबाजी करीत आज येथील कृष्णाबाई व जेष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधीस्थळी दुग्धाभिषेक घालून आंदोलनास प्रारंभ केला. आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: milk agitation swabhimani shetkari sanghtna agitation milk rate karad