दुग्ध व्यवसायातील ग्रहण सुटेना

दीपक मदने
शनिवार, 28 एप्रिल 2018

सांगवी - शेतकऱ्यांच्या शेतीपूरक व्यवसायातील महत्त्वाचे साधन समजल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायावरील ग्रहण काही सुटत नाही. दूध दर घसरणीचे सावट अद्यापही कमी न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून गायीच्या दूध खरेदी दरातील घसरण सुरूच आहे.

ऐन उन्हाळ्यात दुधाची होणारी घसरण थांबत नसल्याने उत्पादकांना दूध दराचा फटका बसत असल्याने शेतकरी हतबल झालेत. सध्या प्रति लिटरसाठी २१ रुपये ५० पैसे दर मिळत असल्याने उत्पादन व चाऱ्याचा मेळ लावणे अवघड झाले आहे. 

शेतकऱ्यांचा आर्थिक कणा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. दुग्ध व्यवसायाने अनेक बेरोजगारांना साथ दिली आहे. दूध विक्रीतून शेतीचा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षापासून दुग्ध व्यवसायाने ग्रासले आहे. जून २०१७ ला दुधाला प्रति लिटर २७ रुपये दर होता. त्यातून उत्पादन खर्च वगळता शेतकऱ्यांना थोडा फार फायदा होत होता. परंतु, नंतरच्या काळात दूध दर घसरल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला.

गेल्या सहा महिन्यांच्या टप्प्यात दूध दरात चढ-उतार झाले. गेल्या तीन ते चार महिन्यांत प्रति लिटर २१ रुपये ५० पैसे इतका दर स्थिर आहे. दूध व्यवसायाचे व्यवस्थापन, चारा नियोजन, वीज या सगळ्यांचा हिशोब केल्यास सध्याचा दर शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. दूध दरवाढीची अद्यापही चिन्हे नाहीत. सध्याच्या दूध दरातून उत्पादन खर्च निघेनासा झाला आहे.

Web Title: milk business issue rate decrease