नगर जिल्ह्यामध्ये दुध संकलन बंद 

सूर्यकांत नेटके
सोमवार, 16 जुलै 2018

नगर, - स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे पुकारण्यात अालेल्या दुध अंदोलनाला नगर जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात असलेल्या 879 सहकारी अाणि 145 खाजगी दुध संकलन केंद्रावर अाज दुध संकलन बंद होते. जिल्हाभरात दर दिवसाला साधारण २४ लाख लि्टर दुध संकलन होते. अाज मात्र साधारण दोन लाख लिटरही दुध संकलन झाले नाही. दरम्याण पोलिसांना जिल्हाभरातील ३५ कार्यकार्यकत्याना अटक केली. स्वाभीमानी, किसान महासभेसह दुध अंदोलनाला पाठिंबा देणाऱया ३५० कार्यकत्याना पोलिसांनी नोटीसा दिल्या. 

नगर, - स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे पुकारण्यात अालेल्या दुध अंदोलनाला नगर जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात असलेल्या 879 सहकारी अाणि 145 खाजगी दुध संकलन केंद्रावर अाज दुध संकलन बंद होते. जिल्हाभरात दर दिवसाला साधारण २४ लाख लि्टर दुध संकलन होते. अाज मात्र साधारण दोन लाख लिटरही दुध संकलन झाले नाही. दरम्याण पोलिसांना जिल्हाभरातील ३५ कार्यकार्यकत्याना अटक केली. स्वाभीमानी, किसान महासभेसह दुध अंदोलनाला पाठिंबा देणाऱया ३५० कार्यकत्याना पोलिसांनी नोटीसा दिल्या. 

दुधाला २७ रुपये प्रतीलिटर दर मिळावा, किंवा प्रती लिटर पाच रुपये अनुदान शेतकरया्च्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आजपासून  अंदोलन पुकारले आहे. त्याला जिल्हाभरातील शेतकरी, कार्यकर्त्यानी प्रतिसाद दिला. जिल्ह्यामध्ये बारा सहकारी दुध संघाअंतर्गत ८७९ दुध संस्था अाहेत. शिवाय १४५ खाजगी दुध संकलन केंद्रे आणि मल्टी्स्टेट दुद संघ अाहेत. या सर्वामार्फत जिल्हाभरात २४ लाख लिटर दुध संकलन केले जाते. अाज मात्र काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी दुध संकलन बंद होते. 

शेवगाव शहरात क्रांती चौकात स्वाभीमानीचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगरे, भिमराज भडके, रमेश कुसळकर, मच्छिंद्र आरले यांनी मोफत दुध वाटले. तालुक्यातील निंबेनांदुर येथे सोमनाथ पावले, अजय बुधवंत, रमेश कुटे, भाऊसाहेब गर्जे, बाळासाहेब बडे यांनी रस्यावर दुध अोतून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. 

राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी अाखाडा येथे ग्रामदैवत जगदंबा देवीला अभिषेक करुन मराठा महासंघाचे शिवाजीराव डौले, प्रकाश भुजाडी, रोहीदास धनवडे, दादा सरोदे, अादीनाथ गुंजाळ, राजेंद्र येवले यांच्यसह शेतकरय़ांनी सुमारे सात हजार लिटर दुध मोफत वाटले. भाळवणी (ता. पारनेर) येथील संदीप व्यवहारे या शेतकरय़ाने दुध अोतून सरकारचे निषेध केला. वडगाव अामली येथे कल्याणकारी दुध संघटनेचे गुलाबराव डेरे यांच्यासह कार्यकत्यानी ग्रामदैवताला अभिषेक केला. दुध उत्पादनात कायम अग्रेसर असलेल्या देहेरे ता. नगर) येथे एकही लिटर दुध संकलन झाले नाही. मानोली (ता. संमगनेर येथेही कार्यकर्ते, शेतकऱयानी ग्रामदैवताला अभिषेक केला.अनेक ठिकाणी लोकांना मोफत दुध वाटले गेले. जिल्ह्यामधील प्रमुख दुध संघानी अंदोलनाला पाठिंबा दिला अाहे. 

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यार्नी रविवारी रात्रीच अंदोलनाला सुरवात केली. त्यानुसार जिल्हाध्यक्ष रवी मोरे, दिनेश वराळे, अरुण डौले, किशोर वराळे, गोविंद वारघुले अादीसह कार्यकत्यानी शिर्डीत साई बाबांना मंदिरासमोर दुग्धाभिषेक करण्याचा प्रयत्न केल्याने अटक केली. पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शऱद मरकड यांच्यासह अन्य दोन कार्यकत्यांनी पोलीसांनी ताब्यात घेतले. जिल्हाभरात सुमारे ३५ कार्यकत्याना अटक केली अाहे. तर किसान सभेचे नेते डॉ. अजीत नवले यांच्यासह दुध अंदोलनाला पाठिंबा देणाऱया स्वाभीमानी, किसानसभेसह अन्य संघटनेच्या कार्यकत्याना पोलिसांनी अंदोलन करण्यास प्रतिबंध करत असल्याबाबतच्या नोटीसा दिल्या अाहेत. 

पंचवीस टॅंकर दुध नेल्याचा दावा
जिल्हाभर दुध अंदोलन सुरु असून दुध संकलन बंद अाहे. मात्र जिल्ह्यामधील संगमनेर, नगर, पारनेर, नेवासे अादी भागातील सुमारे पंचवीस टॅंकर दुध पोलिस संरक्षणात मुंबई, पुण्याकडे नेल्याचा दावा पोलिस फ प्रशासनाने केला आहे. शेतकऱयांना गरज पडेल तेथे.  सक्षमपणे पोलिस संरक्षण दिले जाईल असे प्रशासन अाणि पोलिस सांगत अाहेत.

Web Title: milk collection stop in nagar