दूध पावडरीचे होणार लेखापरीक्षण

तात्या लांडगे
गुरुवार, 21 जून 2018

राज्यातील 23 प्रकल्पांनी केली 19 हजार मे. टन दूध पावडर
सोलापूर - राज्यातील 23 दूध भुकटी प्रकल्पांनी 17 हजार मे. टन दूध पावडर तयार केली. परंतु, या प्रकल्पांकडून शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाच्या आदेशानुसार दर मिळाला का, याची लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने दूध भुकटी तयार करणाऱ्या प्रकल्पांना 13 मे ते 11 जून या कालावधीत तयार केलेल्या पावडरसाठी प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले. परंतु, शेतकऱ्यांच्या दुधाला 27 रुपयांचा दर देणे त्यांना बंधनकारक होते. मात्र, बहुतांशी प्रकल्पांकडून दूध उत्पादकांना 19 ते 23 रुपयांप्रमाणेच दर दिले असल्याने त्याची पडताळणी होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सध्या दूध पावडरीचे दर घसरले आहेत. पावडरीचे दर प्रतिकिलो 132 रुपये आहेत. किमान 180 रुपये दर असावेत आणि पावडरनिर्मितीसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी भुकटी प्रकल्प चालकांकडून होत आहे. सध्या ना नफा-ना तोटा या तत्त्वावरच त्यांना पावडर विक्री करावी लागत आहे.

अनुदानासाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा
दूध भुकटी प्रकल्पांनी तयार केलेल्या पावडरीचे लेखापरीक्षण होणार आहे. संबंधित प्रकल्पांनी दूध उत्पादकांना शासनाच्या आदेशानुसार दर दिला की नाही, याची पडताळणी होणार आहे. त्यामुळे अनुदानासाठी भुकटी प्रकल्प चालकांना आणखी किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आकडे बोलतात...
दूध भुकटी केलेले प्रकल्प 23
भुकटीसाठी वापरलेले दूध 22.68 कोटी लीटर
तयार केलेली भुकटी 17,529 मे.टन
अनुदानाची रक्‍कम 52.59 कोटी रुपये

Web Title: milk powder audit