द्राक्षबागेवर दुधाची फवारणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

मिरज - दूध बंद आंदोलनामुळे झालेली कोंडी फोडण्याचा अनोखा उपाय मिरज पूर्व भागात शेतकऱ्यांनी शोधून काढला. विक्रीविना शिल्लक राहिलेले दूध चक्क द्राक्षबागांवर फवारले. दुधातून द्राक्षवेलींना पोषणमूल्ये मिळतात, असा दावा त्यांनी केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला प्रतिसाद देत मिरज पूर्व भागातील दूध संकलन १०० टक्के बंद राहिले. काही शेतकऱ्यांनी घरोघरी पुरवठा करुन म्हैशीचे दूध खपवले. संकरीत गायीच्या दुधाचे करायचे काय हा प्रश्‍न होता. ते बागेत फवारुन कोंडीतून मार्ग काढला. त्यांनी दावा केला, की दुधाची फवारणी केल्याने बागेला पोषणमूल्ये मिळतात. दूध द्राक्षवेलीच्या पानातून शोषले जाते. त्यातून वेलीची रोगप्रतिकार शक्ती वाढते. शिवाय फुटवेही चांगले येतात. ट्रॅक्‍टरला जोडलेल्या छोट्या टॅंकरमध्ये पाणी आणि दुधाचे मिश्रण करुन वेलींवर फवारले. आरग (ता. मिरज) मध्ये धनराज दूध डेअरीच्या दत्तात्रय शिंदे शाळेत दूध वाटले. बेडगमध्ये श्रीधर उदगावे, सुजित लकडे, श्रीअंश लिंबीकाई, प्रवीण चौगुले आदींनी मोफत दूध वाटप केले. महादेव मंदिरात अभिषेक केला. जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बेडगमधील भरत चौगुले यांच्यासह टाकळी, बेडग येथील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: milk spray on grape farming