सरकारमुळेच दूध संघ अडचणीत - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

इस्लामपूर - राज्य सरकारला दुधाचे धोरण लवकर ठरवता आले नाही. त्यात बाहेरील राज्यातील दुधाची भर पडली. त्यामुळे अतिरिक्‍त दूध झाले. पर्याय म्हणून सरकारने पावडर भुकटी निर्यात करायला पाहिजे होती. परंतु हे न करता अमुल सारख्या दुधाचे मार्केटिंग सरकार करत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसह दूध संघ अडचणीत आल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केली.

येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात झालेल्या राजारामबापू सहकारी दूध संघाच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, जनार्दनकाका पाटील, प्रा. शामराव पाटील, शामराव वाटेगावकर, रवींद्र बर्डे, छाया पाटील, सभापती सचिन हुलवान, पी. आर. पाटील, नेताजी पाटील, विजय पाटील, संजय पाटील, उदयबापू पाटील, सौ. सुस्मिता जाधव,  विश्‍वास पाटील, देवराज पाटील, संजीव पाटील, संग्रामसिंह पाटील, संग्राम फडतरे प्रमुख उपस्थित होते. 

विनायक पाटील म्हणाले,‘‘संघाची ३८२ कोटी वार्षिक उलाढाल झाली आहे. आम्ही केंद्र शासनाचे १२ कोटी  ५० लाख अनुदान व एनडीडीबीकडून १२ कोटी ५० लाखांचे कर्ज घेऊन पावडर प्रकल्प पूर्ण केला आहे. 

प्रतीदिन २ लाख ६० हजार ५४८ लिटर दूध संकलनाचा वेग आहे. १ कोटी ५ लाख रुपये संघामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात 
आले आहे. तर शासनाच्या विविध योजनेतून १६ कोटी अनुदान संघास मिळाले आहे. चांगल्या प्रतीच्या दुधाबद्दल ‘डेअरी एक्‍सलन्स ॲवॉर्ड’’ संघास मिळाला आहे.’’ 

सर्व संचालक, सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी आभार मानले.

दूध व्यवसायासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना सर्व संचालकांना सोबत घेऊन विनायक पाटील यांनी संघ चांगल्या प्रकारे चालवला आहे. कोणतीही परिस्थिती आली तर दूध विक्री कशी करायची हे त्यांना चांगलेच माहीत आहे.
- जयंत पाटील  

Web Title: Milk Union Problem by Government jayant Patil