#MilkAgitation स्वत:ला आणि जनावरांना दुग्धाभिषेक

हुकूम मुलाणी
मंगळवार, 17 जुलै 2018

मंगळवेढा - दुधाच्या कमी दरामुळे पशुपालकांना जनावरे जतन करणे मुश्कील होत चालल्यामुळे परिणामी कौटूंबिक गाडा हाकणे देखील मुश्कील झाले. सध्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे दर वाढीसाठी आंदोलन सुरु असताना शासनाच्या या धोरणाचा निशेध करण्यासाठी तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील सागर लेंडवे या युवकांने चक्क दुधाने स्वत: व जनावरांना दुधानेच अंघोळ घालून कमी दराबाबत असलेला आपला संताप व्यक्त केला.

तालुक्यातील दुष्काळ गावाच्या यादीमधील पश्‍चीम भागात असलेल्या लेंडवे चिंचाळे या गावातील ग्रामस्थांना उदारनिर्वाह जिरायत शेतीबरोबर दुध व्यवसायांशी जोडला गेला. पावसाच्या बेभरवशामुळे शेती अडचणीत आली. आणि दुधाच्या धंदयावर पोट असलेल्या या गावात 9 दुध संस्था असून, जवळपास सकाळ व संध्याकाळचे 3 हजार इतक्या दुधाचे संकलन या गावातून होत आहे. पण गेल्या काही दिवसापासून दुधाच्या ढासळलेल्या दरामुळे या परिसरातील पशुपालकांचे आर्थीक बजेट देखील कोसळले आहे.

चार जनावरे जतन करताना कमी दरामुळे नाकीनव येत आहे. दुधाचा पशुपालकाकडून खरेदीचा दर बिसलेरी पेक्षा कमी आणि विक्री दर जास्त आहे. मोठया तफावतीमध्ये शासनाने लक्ष घालणे आवश्यक होते. पण दुदैवाने तसे होताना दिसत नाही. त्यामुळे दुष्काळी गावात जगायचे कसे? सध्या 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतयं' अशी आवस्था परिसरात शेती व जनावरे जतन करताना होत असल्याची खंत सागर लेंडवे यांनी यांनी व्यक्त केली.

Web Title: #MilkAgitation famers took milk bath