सातारा येथील मीनाक्षी बझार इमारतीला सील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

सातारा : येथील अजिंक्य कॉलनीमधील मिनाक्षी बझार या इमारतीवर घेतलेले 3 कोटी 83 लाख 45 हजार रूपये कर्ज थकीत प्रकरणी विशाल मेगा मार्टसह 12 गाळे साहेबराव देशमुख को. ऑ. बँकेने आज सील केले.

मीनाक्षी बझार या इमारतीवर विजय हणमंतराव शिंदे यांच्याकडून 3 कोटी 83 लाख 45 हजार 61 रूपयांची थकबाकी येणे आहे. ते कर्ज न भरल्याने साहेबराव देशमुख को-ऑ. बँकेच्या अधिकार्‍यांनी शनिवार (ता. 31) सकाळी 11 वाजता विशाल मेगा मार्ट आणि इमातीमधील 12 गाळे सील करून कारवाई केली. बँकेच्या या कारवाईने गाळेधारक व बँकेचे अधिकारी यांच्या शाब्दीक वादही झाले.

मीनाक्षी बझार या इमारतीचे मालक विजय शिंदे माहिती देताना म्हणाले, या इमारतीवर मी 2012 साली साडेतीन कोटीचे कर्ज काढले होते. नोटीस न देता केलेल्या बँकेच्‍या कारवाईला माझा विरोध आहे. सहकार न्यायालयात मी याचिका दाखल केलेली आहे. विशाल मेगा मार्टनेही हायकोर्टात दावा दाखल केला आहे.

Web Title: Minakshi Bazar building sealed by Sahebrao Deshmukh Co operative bank