वडनेरच्या धर्तीवर टाकळीकर जलक्रांती करणार... 

The mindset of conducting experiments in the taluka Dhokeshwar
The mindset of conducting experiments in the taluka Dhokeshwar

टाकळी ढोकेश्वर : वडनेर हवेली (ता. पारनेर) येथे लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांमुळे गावामध्ये आज सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. या कामांच्या धर्तीवर टाकळी ढोकेश्वरमध्ये पाणी अडविण्याच्या दृष्टीने कामे झाली. त्यामुळे टाकळी ढोकेश्वरमध्ये जलक्रांती झाली. 

वडनेर हवेली येथे लोकसहभागातून जलसंधारणासह पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने 
मोठ्या प्रमाणावर कामे झाली. त्यामुळे गावातील विहिरींसह अन्य स्रोतांना पाणी वाढले. या कामांची माहिती घेण्यासाठी टाकळी ढोकेश्वरमधील तरुण सामाजिक कार्यकर्ते आनंद झावरे, सचिन बांडे, अशोक पायमोडे, दामोदर झावरे, रवी पायमोडे, महेश झावरे यांनी भेट दिली. गावात हे काम कसे करता येईल, याची माहिती त्यांनी घेतली. 

टाकळी ढोकेश्वरमध्ये प्रयोग राबविण्याचा मानस 
ग्रामस्थांनी श्रमदानाच्या कामाची पाहणी केली. हे पाहत असताना त्यातील बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जलसंधारणाच्या कामामुळे गावातील पाणीपातळी वाढून, आजही गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेल ओसंडून वाहत आहेत. हे पाहून जलप्रेमींच्या चेहऱ्यांवर आनंद विलसत आहे. वडनेर हवेलीच्या धर्तीवर टाकळी ढोकेश्वरमध्येही अशा प्रकारचा प्रयोग राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 

विनायंत्र पाणी चालू 
पाऊस थांबून महिना झाला तरी, आजही वडनेर हवेलीत बोअरवेलमधून विनायंत्र पाणी चालू आहे. आम्ही गावात जाऊन पाहणी केली. येथील तरुणांनी जलमित्र बनून खूप चांगली कामे केली आहेत. त्याच प्रकारची जलसंधारणाची कामे टाकळी ढोकेश्वरमध्ये करण्याचा मानस आहे. 
- आनंद झावरे, सामाजिक कार्यकर्ते 

वडनेर हवेलीचे जलसंधारणाचे काम नक्कीच वाखण्याजोगे आहे. त्याचा आदर्श आमच्या गावातील तरुणांनी घेतला आहे. आमचे सहकारी मित्र व आम्ही निश्‍चित वडनेरच्या कामाची प्रेरणा घेऊन गावासाठी नवीन्यापूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करू. 
- विलास गोसावी, सेवानिवृत्त कृषी अधिकारी   

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com