शेतमालासाठी वर्षभर हमी भाव खरेदी केंद्र सुरु ठेवावे : भाऊसाहेब मांडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

श्रीगोंदे, ( नगर) : राज्यात शेतकऱ्यांची शेतमालाच्या दराबाबत फसवणूक सुरु आहे. शेतमालाला दर मिळत नसल्याने सरकारने पुढाकार घेवून बाजार समितीच्या माध्यमातून वर्षभर शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे श्रीगोंदे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी केली आहे. 

रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते भानुदास शिंदे यांच्यासह मांडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मांडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याचे आरोप होत आहेत. नाईलाज असल्याने व्यापाऱ्यांना शेती माल मिळेल त्या किंमतीला विकावा लागतो. 

हमीभावाचे केंद्र जोपर्यंत सुरु असते त्यावेळी व्यापारीही शेतकऱ्यांना चांगले दर देतात. मात्र केंद्र बंद झाली की व्यापाऱ्यांची मनमानी सुरु होते. त्यामुळे असी हमीभाव केंद्र वर्षभर सुरु राहिली तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळेल. 

मांडे म्हणाले, फळे व भाजीपाला नियमन मुक्तीचा निर्णय चांगला असला तरी बाहेरचे जे व्यापारी फळे व भाजीपाला खरेदी करतात त्यांचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर देत नाहीत. याला आळा घालण्यासाठी सदर व्यापाऱ्याने असा माल खरेदी करण्यापुर्वी त्याती पुर्ण माहिती बाजार समिती अथवा कामगार तलाठ्याकडे देणे सक्तीचे व्हावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minimal support price center should open for a year said bhausaheb mande