...तर पत्नीच्या प्रचारालाही मी जाणार नाही

...तर पत्नीच्या प्रचारालाही मी जाणार नाही

मुरगुड - जर माझ्या पत्नीने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली (करणार नाही ) तरीपण ती उभी राहिली. तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेवू पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला मी जाईन. जर मी पत्नीच्या प्रचाराला जात नसेल तर धनंजय महाडिक यांच्या प्रचाराला जाण्याचा मुद्दाच नाही. दोस्ती बाजूला युतीधर्म पहिला, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मुरगूड नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचा प्रारंभ व शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. प्रा. संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. 

श्री. पाटील म्हणाले, अनेकांच्या मनात शंका होती, भारतीय जनता पक्ष, चंद्रकांत पाटील काय करणार ? खरं म्हटलं तर शंका घ्यायचं कारण नाही. भाजपने नेहमी युती धर्म पाळला आहे. आणि मला तर पक्ष ठरवेल तेच करण्याची सवय आहे. दोस्ती असते ही एका ठराविक मर्यादेपर्यंत, दोस्तीखातर आम्ही धनंजय महाडिक यांना तुम्ही शिवसेनेचा उमेदवार व्हा, असेही म्हटले होते, आम्ही संजय यांना समजवतो. भारतीय जनता पक्ष - शिवसेनेकडे सरकार आहे तुम्ही शिवसेनेचे उमेदवार झाला असता तर मी संजयपेक्षा निश्चितच तुमचा प्रचार अधिक जोमाने केला असता. आता संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला येथे युतीधर्म सर्वात महत्त्वाचा आहे.

यावेळी संजय मंडलिक, म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, संजय पवार, नीता मगदूम, रूपाली अंगज यांची भाषणे झाली. नगर परिषदेच्या विविध योजनांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव,  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष संजय पवार, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, वीरेंद्र मंडलिक, शिवानी भोसले विजय भोसले, अमरसिंह घोरपडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com