गोकुळ संघ मल्टिस्टेट होऊ देणार नाही - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

कोल्हापूर - माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव जिल्हा दूध संघामध्येच (गोकुळ) अडकला आहे. गोकुळ प्रायव्हेट कंपनी करण्यासाठी त्यांनी मल्टिस्टेटचा ठराव केला आहे; पण शासन मल्टिस्टेट करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र देणार’ नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महाडिक यांनी ‘गोकुळ’साठी खासदार धनंजय महाडिक यांचा तर बळी दिलाच; पण आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनाही अस्वस्थ केले आहे, असा खरमरीत आरोपही त्यांनी महादेवराव महाडिक यांच्यावर केला.

ते म्हणाले, ‘‘गोकुळसाठी त्यांचा हा आटापिटा असला तरी गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता आहे. ती मल्टिस्टेट करू देणार नाही. राजारामपुरी येथे पदयात्रा झाल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.  राजारामपुरीसह स्वयंवर मंगल कार्यालय, टिंबर मार्केटमधील लोळगे लॉन, रंकाळा टॉवर येथील इंद्रायणी हॉल आदी ठिकाणीही सभा झाल्या.

ते म्हणाले, ‘‘केवळ गोकुळ मॉडेल म्हणून धनंजय यांना सेनेची उमेदवारी घेऊ दिली नाही, राष्ट्रवादीचीच उमेदवारी घेण्याची त्यांच्यावर सक्ती केली. देशभरात निवडणूक देशाची सुरक्षा, आंतरराष्ट्रीय महत्त्व, मोदी आणि त्याचा विकास याभोवती फिरत आहे. दुर्दैवाने कोल्हापुरात मात्र ती वैयक्तिक आणि स्थानिक पातळीवरच सुरू आहे. माझ्याबाबतही अफवा पसरविण्याचे उद्योग महाडिकांच्या चेले, चपाट्याकडून, कानात कुजबुजणाऱ्यांकडून सुरू आहेत; पण युती हाच माझा धर्म आहे. या धर्माशी कधीही तडजोड करणार नाही. मुश्रीफ, सतेज यांनी प्लॅनिग करूनच धनंजय यांना राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यास भाग पाडले. धनंजय सेनेकडून लढले असते तर एकतर्फी निवडणूक झाली असती; पण गोकुळसाठी महादेवराव महाडिकांनी धनंजय यांचा बळी दिला.’’

ते म्हणाले, ‘‘भाजपने मजबूत सरकार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीनशेहून अधिक उमेदवार निवडून आणायचे आहेत. सेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना लाखाचे मताधिक्‍य मिळवून देऊ.’’

शिवसेनाप्रमुख संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सुजित चव्हाण, अशोक देसाई, विजय जाधव, आर. डी. पाटील, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

लोकसभेत देशाची धोरणे
लोकसभेत देशाची धोरणे ठरतात, स्थानिक प्रश्‍नांना महत्त्व नसते. त्यामुळे उमेदवार कोण आहे, यापेक्षा पक्ष किती महत्त्वाचा आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रा. मंडलिक महायुतीचे उमेदवार आहेत. महायुती सत्तेवर आहे. त्यामुळे देशाचा, राज्याचा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांची उमेदवारी महत्त्वाची असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Minister Chandrakant Patil comment