हसन मुश्रीफांबाबत गमतीने म्हणालो होतो : चंद्रकांत पाटील

हसन मुश्रीफांबाबत गमतीने म्हणालो होतो : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - पंधरा दिवसापुर्वी गमतीने मी भाजपमध्ये येता का? असे आमदार हसन मुश्रीफ यांना म्हणालो होतो. ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर छापे टाकले, हे म्हणणे चुकीचे आहे. कारण अशा यंत्रणांना छापे टाकण्यासाठी दोन वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या छापा प्रकरणांशी आमचा कांहीही संबध नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री. पाटील म्हणाले,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्ष लोकांना भिती दाखवून भाजपमध्ये प्रवेश करुन घेत असल्याचा आरोप केला आहे. खरंतर राष्ट्रवादीला त्यांची माणसे त्यांना साभाळता आली नाहीत. 

श्री. पाटील म्हणाले,  घराणेशाहीची काँग्रेसची परंपरा शरद पवार पुढे चालवतात. पंतप्रधान नेहरूनंतर प्रत्येक पंतप्रधान आपल्याच घराण्यातला असावा, असे काँग्रेसचे राजकारण आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत बोलू दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना पुढे येऊ दिले नाही. त्यांची ही परंपरा आजही शरद पवार पुढे चालवत आहेत. बारामती लढण्यासाठी त्यांना मुलगीच लागते. मावळ त्यांना पार्थ पवार यांनीच लढवावा असे वाटते. विधानसभेला रोहित पवारच लागतात. तुमच्यातून माणसे बाहेर पडत आहेत, याचे कारण सुरवातीला त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. शिवसेना - भाजप मजबूत नव्हते. त्यामुळे लोकांनी सहन केले. आता लोक सहन करत नाहीत. भाजपमध्ये येत आहेत, असेही पाटील म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com