प्रती माणसी प्रती दिन 60 रुपये गावात जावून पुरग्रस्तांना द्या - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर -  गावात राहिलेल्या पुरग्रस्तांना प्रति माणसी प्रति दिन 60 रुपये, तर लहान मुलांना 45 रुपये गावात जावून द्या. शिबिरामध्ये पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या एनजीओंना शासकिय दराप्रमाणे प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

जिल्हा परिषदेमध्ये मंत्री श्री. पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अमल मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते. 

मंत्री श्री. पाटील यांनी इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, हातकणंगलेचे तहसिलदार सुधाकर भोसले यांना फोन करुन शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पूरपरिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडूनही दूरध्वनीद्वारे पूरपरिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.

यानंतर मंत्री श्री. पाटील म्हणाले, पूरग्रस्तांसाठी छावणीमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना शासन शासकीय दराने पैसे देणार आहे.  उद्यापासून अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त गावात जाऊन घरांमध्ये असणाऱ्या व्यक्तींना प्रतिदिन प्रती माणसी साठ रुपये तसेच लहान मुलांना पंचेचाळीस रुपये द्यावेत त्याबाबत योग्य नियोजन करावे. पूरग्रस्तांसाठी पुणे येथून भाजीपाल्याचे ट्रक मागविण्यात येणार आहेत. शहरामध्ये कमी दराने विक्री केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Chandrakant Patil comment