शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patil

मोहोळ : दुष्काळी परिस्थितीत सर्व सामान्याला उभारी द्यावयाची असते, जेणेकरून त्याला आधार वाटेल, विरोधक मात्र सर्वसामान्याचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत, गुरुवारपासून खास बाब म्हणून चारा छावणीत दहा हजार जनावरांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

दुष्काळाची पाहणी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्री पाटील देवडी ता. मोहोळ येथे आले होते, त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. पाटील यांनी शासनाने शेतकऱ्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले ,सध्याचा दुष्काळ हा अन्नधान्याचा कमी आहे, पण पाण्याचा जास्त आहे. मी दुष्काळा संदर्भात गठित केलेल्या समितीचा अध्यक्ष असल्याने खरी वस्तुस्थिती काय आहे, याची पाहणी करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. छावण्यांच्या अनेक अटी केल्या आहेत. दुष्काळा संदर्भात ज्या आठ सुविधा द्यावयाच्या असतात, त्या आपण देत आहोत, पाणी टंचाईमुळे दररोज टँकरची संख्या वाढत आहे. मागेल त्याला काम ,मागेल त्याला रोजगार हे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रशासनाकडून छावण्यासाठी प्रत्यक्षात पैसे कमी येतात, मात्र शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून राज्यशासन त्यात आपला वाटा मिसळून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. चारा छावण्या हा धंदा नाही, ते सामाजिक काम आहे हे समजून करावे. चालू वर्षी 3 हजार  दोनशे कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, लवकरच त्याचे वाटप होईल असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, वाफळे गावची पाण्याची अडचण आहे, त्याचा सर्वे ही झाला आहे. रोपळे इथून पाणी आणणे सोईचे  होणार आहे ,त्यामुळे देवडी, तेलंगवाडी या गावांनाही पाणी मिळणार आहे. मोहोळ तालुक्यात छावण्यांची गरज आहे ,मात्र छावणी चालकाला जनावरांच्या मागे मिळणारा दर कमी असल्याने छावणीचा प्रस्ताव देण्यासाठी कोणी धाडस करीत नाही. देवडी येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी थोरात यांनी गावच्या समस्या मांडल्या.ते म्हणाले  देवडी ला पाण्याची मोठी अडचण आहे, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठीमागे आम्ही पंधरा वर्षे राहिलो, मात्र  पाण्याचे काम झाले नाही, पाण्यापासून आम्ही आजही वंचित राहिलो आहे. केवळ चार किलोमीटर पाईपलाईन वाढविली तर पाच गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या शासनाने हे काम करण्याचा आग्रह त्यांनी धरला.

देवडी येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना मोहोळ चे भाजपचे नेते संजय क्षीरसागर म्हणाले, दुष्काळी दौरा मोहोळचा आहे मोहोळ चा आढावा घ्यावा, त्यावेळी पाटील म्हणाले हो मला माहिती आहे तुम्हाला विधानसभा लढवायची आहे, त्यामुळे तुम्ही मोहोळ चा आग्रह धरणारच. त्यामुळे संजय क्षिरसागर हे मोहोळ विधानसभेचे उमेदवार असल्याचे अधोरेखित झाल्याची चर्चा होती. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुका अध्यक्ष सतीश काळे, जि प सदस्य तानाजी खताळ, दादा साठे, नागनाथ क्षिरसागर, शिवाजी कांबळे, संजय कोकाटे ,सतीश पाटील, मुजीब मुजावर, सौदागर खडके, पांडुरंग बचुटे, डॉ. अमित व्यवहारे, बाळासाहेब पाटील, जे के गुंड ,सत्यवान देशमुख ,केशव वाघचौरे, उत्तम मुळे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, सोमेश क्षीरसागर समता गावडे आदीसह शेतकरी  उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com