Loksabha 2019 : शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्यांसोबत शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

 ‘ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी  शेतकऱ्यांची वाट लावली त्यांच्या मांडीला मांडी लावून खासदार राजू शेट्टी बसले आहेत. त्यांना आजही मी विष्णूचा अवतार मानतो. कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी आणली आणि लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. मात्र, ज्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत, त्यांच्यासोबत शेट्टी गेल्याने त्यांना आपला विरोधच असेल. 

कोल्हापूर - ‘ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी  शेतकऱ्यांची वाट लावली त्यांच्या मांडीला मांडी लावून खासदार राजू शेट्टी बसले आहेत. त्यांना आजही मी विष्णूचा अवतार मानतो. कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी आणली आणि लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. मात्र, ज्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत, त्यांच्यासोबत शेट्टी गेल्याने त्यांना आपला विरोधच असेल. ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला?’ शेट्टींना इतक्‍या लवकर राग येण्याचे कारण नव्हते. काहीतरी असल्याशिवाय त्यांना माझे बोलणे झोंबलेले नाही. काळाच्या ओघात सगळे काही स्पष्ट होईल,’ अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरताना शेट्टी यांनी स्वतःचे घर भरल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी मी त्यांच्यासोबत होतो, त्यावेळी विष्णूचा अवतार वाटायचो. बाजूला गेलो तर घर भरणारा झालो, याचे आश्‍चर्य वाटते.

राज्याचे दोन नंबरचे खाते चंद्रकांत पाटील सांभाळतात. दुसऱ्या अर्थाने दोन नंबरचे खातेही ते सांभाळतात. मी देखील कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार, ठेकेदार, जिल्हाधिकारी यांना बिंदू चौकात बोलवून घेतो आणि त्यांनी किती पैसे दिले याचा पाढा वाचून दाखवतो. डांबरात, मातीत आणि खडीत पंचनामा करू, असे शेट्टी म्हणाले होते. त्याला प्रत्यूुत्तर देताना पालकमंत्र्यांनी आज प्रत्युत्तर दिले.

शेट्टी जयंतरावांसोबत डबल सीट बसतात कसे?
ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली. त्यांच्या मांडीला मांडी लावून शेट्टी बसलेत. त्यांनी आजही मी विष्णूचा अवतार मानतो. त्यांनी शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी आणली; मात्र शेट्टी हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सायकलवर डबल सीट बसतात कसे?, विष्णू हा परमेश्‍वर आहे म्हणून काय झाले? तो चुकत असेल तर बोलायला नको? जे चुकीचे आहे ते चूकच आहे, अशी माझी धारणा आहे.

Web Title: Minister Chandrakantdada Patil comment