बबनदादांचा स्वभाव बदलत चाललाय: जलसंपदामंत्री महाजन

Girish Mahajan
Girish Mahajan

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : या शासनाचे धोरण शेतकरी हिताचे आहे. त्यामुळे सत्तेतील लोकांचीच कामे न करता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांची कामे पहिल्यांदा करायची. त्यांचे मनपरिवर्तन करायचे. जसे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे मनपरिवर्तन झाले. तसे बबनदादांचा स्वभावही बदलत चाललंय किती दिवस तिकडे राहतील. असे सुचक वक्तव्य राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केले.

माढा तालुक्यातील रोपळे खुर्द येथे सिना-माढा उपसासिंचन योजने अंतर्गत उजव्या कालव्यावरील वितरीका क्र.२ व पुच्छ वितरीका बंद पाईप लाईन सिंचन वितरण प्रणाली भुमिपूजन प्रसंगी ते आले असता बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार धनाजीराव साठे उपस्थित होते.

जलसंपदामंत्री गिरीष महाजन म्हणाले की, हे शासन शेतकरी हिताचे आहे. प्रत्येक शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी जाईल अशी व्यवस्था होईल असे सरकारचे धोरण आहे. शेतकर्यांला मुबलक पाणी मिळल्यास शेतकर्यांना दुसर्यां कुठल्याह्या मागण्या करण्याची गरज पडणार नाही. आत्महत्याही थांबतील. पुर्वीच्या सरकारच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी लोकप्रतिनिधीच्या भागातीलच विकास होत असे. परंतु या शासनाचे धोरण वेगळे असुन शासन काँग्रेस राष्ट्रवादी लोकांची प्रथम कामे करत आहे. त्यांचे विचार बदले पाहिजेत. जसे माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचा विचार बदलला आहे. असे म्हणताच प्रशांत मालकांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्याकडे बोट करत यांचाही विचार बदलला आहे असे म्हणताच उपस्थितीतामध्ये हस्याकल्लोल निर्माण झाला. पुढे श्री महाजन म्हणाले की, बबनराव शिंदे हे धडाकेबाज आमदार असुन चालु सरकारच्या काळातही त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना हाताशी धरूण चांगली कामे केलेली आहेत. आमदार बबनराव शिंदेचे माझ्याकडुन एखादे काम होत नसल्यास ते थेट मुख्यमंत्र्यांकडे जातात. तिकडुन मुख्यमंत्री फोनवरून लगेच सांगतात बबनदादांचे काय काम असेल ते करून टाका 'आपलीच माणसे' आहेत. त्यामुळे 'बबनदादांचाही स्वभावही बदलत चाललंय किती दिवस तिकडे राहतील असे सुचक वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी उजनी धरणातील उपलब्ध साठ्यातुन पाणी सोडण्याची मागणी केली असता. नामदार महाजन यांनी अभ्यास चालु आहे. लागेल तेंव्हा देवु असे म्हणत वेळ मारून नेली.

नामदार महाजन यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे माढा तालुक्याचे आमदार  बबनराव शिंदे खरेच भाजप मध्ये जाणार चर्चेला ऊत आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com