गंभीर पूरस्थितीमुळे गिरीश महाजन कोल्हापुरात

लुमाकांत नलवडे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर दौऱ्यावर येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थिती पूर्णपणे मंत्रालयातून नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावर आज (ता. 7) दुपारी बारा वाजता 74 हजार 621 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. यामध्ये केवळ धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग हा 17400 आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर दौऱ्यावर येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थिती पूर्णपणे मंत्रालयातून नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे.
वारणेत सोडण्यात आलेला विसर्ग हा 30 हजार 134 आहे. राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी यातून पंचगंगा नदीमध्ये साधारण एकवीस हजार चारशे इतका विसर्ग होत आहे. दूधगंगेचा विसर्ग 21 हजार असून तो कर्नाटककडे जात असल्यामुळे त्याचा परिणाम कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर होत नाही.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडून आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून याबाबतचे नियोजन सुरू झाले आहे. पूर परिस्थिती 1989 आणि 2005 पेक्षा भयंकर असल्यामुळे कोल्हापुरातील पूर स्थिती बाबत थेट राज्य सरकारने मंत्रालयातून सर्व सूत्रे हलवण्याचे काम सुरू केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister Girish Mahajan will be visit at Kolhapur for flood condition