उद्धव ठाकरे यांच्या वारीने राम मंदिर अशक्य - आठवले

उद्धव ठाकरे यांच्या वारीने राम मंदिर अशक्य - आठवले

कोल्हापूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कितीही वेळा अयोध्येत गेले तरी राम मंदिर होणार नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा निकाला लागला पाहिजे. तसेच, मुस्लिम समाजाला विश्‍वासात घेऊन राम मंदिर उभारले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी संवाद साधला. श्री. आठवले म्हणाले, ‘‘अयोध्येत ज्या ठिकाणी राम मंदिर उभारणार आहेत, त्याचा इतिहास पाहता ती बुद्धभूमी आहे. त्या ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती मिळाल्या आहेत. त्या ठिकाणी मंदिर झाले पाहिजे, ही देशातील अनेक लोकांची भावना आहे. राम मंदिर झालेच पाहिजे. मात्र, हे बांधताना बेकायदेशीर बांधू नये. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय बांधू नये. जी जागा हिंदू समाजाला दिली जाईल, त्याच जागेत मंदिर बांधले पाहिजे. मुस्लिम समाजालाही विश्‍वासात घेतले पाहिजे. मुस्लिम समाजावर अन्याय होता कामा नये. अयोध्येत उद्धव ठाकरे यांना वारंवार जाण्याची गरज नाही. तरीही त्यांना १८ खासदारांना घेऊन जायचे आहे. ताकद दाखविण्यासाठी ते गेल्यास राम मंदिर होईल, असे नाही. न्यायालयाने निकाल लवकरात लवकर द्यावा, असे इतिहास सांगत असल्याचेही ते म्हणाले.

बॅलेट पेपरमुळे बनावट मतदानाचा धोका
बॅलेट पेपरमुळे दोन्हीकडून बनावट मतदान होण्याचा धोका आहे. त्यामुळे जी सिस्टिम आहे, त्याच सिस्टिमने मतदान केले पाहिजे. पण, ईव्हीएम मशिनवर वारंवर शंका घेतली जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले त्या ठिकाणची मशिन खराब आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्या ठिकाणचे मशिन खराब नाहीत का, असाही सवाल आठवले यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com