शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावे  - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

लोकसभा निवडणूकीत वंचित आघाडीचा किंचित परिणाम झाला. पण, दलितांना सत्तेपासून दुर ठेवणारी आघाडी म्हणजे वंचित आघाडी आहे. सांगलीमध्ये पडळकरांना जी मते मिळाली ती त्यांच्या लोकमतामुळे मिळाली आहेत.

- रामदास आठवले

 कोल्हापूर - लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसने केवळ एकच जागा जिंकली आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे. तर वंचित आघाडीचा किंचित परिणाम या निवडणूकीत दिसला आहे. यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एन. डी. ए मध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या श्री आठवले यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. श्री आठवले म्हणाले, लोकसभा निवडणूकीमध्ये वंचित आघाडीला आपली जागा कळाली आहे. तसेच, राहुल गांधीनाही तोंड दाखवायला जागा नाही. नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानांना शरद पवार यांच्यासारखे नेते मिळाले तर देशाचा कारभार अधिक चांगल्याप्रकारे होवू शकेल, असेही आठवले म्हणाले. सत्तेत कसा वाटा मिळवायचा आणि मंत्रीपद मिळवायचे ते माझ्याकडून शिकले पाहिजे, असा सल्लाही श्री. आठवले यांनी दिला. 

लोकसभा निवडणूकीत वंचित आघाडीचा किंचित परिणाम झाला. पण, दलितांना सत्तेपासून दुर ठेवणारी आघाडी म्हणजे वंचित आघाडी आहे. सांगलीमध्ये पडळकरांना जी मते मिळाली ती त्यांच्या लोकमतामुळे मिळाली आहेत.

- रामदास आठवले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Ramdas Athawale comment