शेट्टींनी जातीय राजकारण केल्यानेच शेतकरी संघटनेत फुट

युवराज पाटील
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

शिरोली पुलाची -  खासदार राजू शेट्टी यांनी जातीचे राजकारण केले, त्यामुळेच शेतकरी संघटनेत फुट पडली, असा आरोप  कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला तसेच शेतकऱ्यांचे हित व विकासाचे राजकारण केले असते, तर आपण एकसंध असतो, असाही टोला श्री. खोत यांनी लगावला. 

शिरोली पुलाची -  खासदार राजू शेट्टी यांनी जातीचे राजकारण केले, त्यामुळेच शेतकरी संघटनेत फुट पडली, असा आरोप  कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला तसेच शेतकऱ्यांचे हित व विकासाचे राजकारण केले असते, तर आपण एकसंध असतो, असाही टोला श्री. खोत यांनी लगावला.  

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. येथील संभाजीराजे चौकात सभा झाली. 

श्री. खोत म्हणाले, मंत्रीपद आम्हाला मिळाले, त्यांना नाही म्हणून खासदार राजू शेट्टीनी भाजपची साथ सोडली शेट्टीसारखी खोटी व स्वार्थी प्रवृत्ती बहुजन समाज ठेचून काढेल, असा विश्वासही मंत्री खोत यांनी व्यक्त केला.

मी मतदारसंघात दोनशे पंचवीस कोटींचा विकास निधी दिला आहे. तुम्ही विकासनिधी किती आणला आणि कुणाला दिला हेही एकदा जाहीर करा. असे आवाहनही श्री. खोत यांनी केले. 

आमदार डॉ. सुजीत मिणचेकर म्हणाले, विकास होईल म्हणून जनतेने खासदारांना संधी दिली ; मात्र त्यांनी भकास केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. 

आमदार उल्हास पाटील म्हणाले, स्वाभिमान त्यांच्या नाही तर आमच्या रक्तात आहे. त्यासाठी विद्यमान खासदारांना घरी बसवून, आम्हाला प्रायश्चीत घ्यायचे आहे.

माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, गेल्या दहा वर्षापासून मतदार संघाचा विकास ठप्प झाला आहे. काटा उभा केला तर वाटा जातोय म्हणून खासदारांनी एकाही साखर कारखान्याच्या दारात वजन काटा उभारला नाही असा आरोप जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केला.

सतिश पाटील, बाजीराव पाटील, भागवत शिंदे, राजेश पाटील यांची भाषणे झाली. उपसरपंच सुरेश यादव, अनिल खवरे, महेश चव्हाण, दिपक यादव, विठ्ठल पाटील, सुरेश पाटील, संग्राम कदम, अविनाश कोळी, जोतीराम पोर्लेकर, गोविंद घाटगे, अविनाश बनगे, रूपाली खवरे उपस्थित होते.

काँगेसचे सरपंच शशिकांत खवरे सेनेच्या व्यासपीठावर
सभेत काँगेसचे सरपंच शशिकांत खवरे व्यासपीठावर होते. मंत्री खोत यांचा आदेश मानून धैर्यशील माने यांचा प्रचार करणार असल्याचे सांगत, त्यांनी राजू शेट्टीच्यावर जोरदार टिका केली. 

अफवांसाठी स्वतंत्र टोळी
निवडणुकीत त्यांच्याकडे अफवासाठी स्वतंत्र टोळी आहे. त्या टोळीचा मुख्याध्यापक मी होतो. त्यामुळे आता त्यांच्या अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन मंत्री खोत यांनी केले.

Web Title: Minister Sadabhau Khot comment