esakal | ...अन्यथा विष्ठा खाण्याची तयारी ठेवा; सदाभाऊंची जीभ घसरली
sakal

बोलून बातमी शोधा

...अन्यथा विष्ठा खाण्याची तयारी ठेवा; सदाभाऊंची जीभ घसरली

कोल्हापूर - कडकनाथ कोंबडी पालनातील घोटाळ्यात मी, माझे कुटूंब या कंपनीत संचालक किंवा संबधीत असेल तर आपण नुसते राजकारणच सोडणार नाही, तर भर चौकात हा सदाभाऊ खोत कुटूंबासह जाहीर फाशी घेईल. ही तयारी आम्ही ठेवली आहे. पण हे जे आरोप केले आहेत ते कायदेशीररित्या किंवा कागदोपत्री सिध्द करता आले नाही तर भर चौकात तुम्ही विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी, असे जाहीर आव्हान राज्यकृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले. 

...अन्यथा विष्ठा खाण्याची तयारी ठेवा; सदाभाऊंची जीभ घसरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कडकनाथ कोंबडी पालनातील घोटाळ्यात मी, माझे कुटूंब या कंपनीत संचालक किंवा संबधीत असेल तर आपण नुसते राजकारणच सोडणार नाही, तर भर चौकात हा सदाभाऊ खोत कुटूंबासह जाहीर फाशी घेईल. ही तयारी आम्ही ठेवली आहे. पण हे जे आरोप केले आहेत ते कायदेशीररित्या किंवा कागदोपत्री सिध्द करता आले नाही तर भर चौकात तुम्ही विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी, असे जाहीर आव्हान राज्यकृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले. 

कडकनाथ कोंबडी पालनात महारयत अॅग्रो या कंपनीने 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही कंपनी मंत्री खोत यांच्याशी संबंधीत आहे असे आरोप केले जात आहेत. यासंबंधी श्री खोत स्पष्टीकरण देत होते. 

श्री. खोत म्हणाले, ज्यावेळी तुम्ही आरोप करता. त्यावेळी तुमच्याकडे पुरावे पाहिजेत. याउलट ज्यांच्यावर  भ्रष्टाचारांचे आरोप आहेत अशा बिहारच्या लालू प्रसाद यांना माजी खासदार राजू शेट्टी दवाखान्यात भेटायला गेले होते. यावेळी तुमचे हात कोणाचे होते. कोणत्याही संघटनेत हजारो कार्यकर्ते काम करत असतात. यापैकी एखाद्याने चुकीचे काम केले तर त्याचा दोष नेत्याला कसा काय देता. शिरोळमध्येही स्वाभिमानीच शेतकरी संघटनेचाच कार्यकर्ता असणार एक जण खासगी सावकारी करताना सापडला. त्याच्यावर गुन्हा नोंद झाला म्हणून आम्ही शेट्टींना दोष देणे योग्य नाही. एखादा कार्यकर्ता चुकीचा असू शकतो. म्हणून सगळेच असतात असे नाही

श्री. खोत म्हणाले, माझ्यावर सातत्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून आरोप होत आहे. महारयत अॅग्रो आणि रयत शेतकरी संघटना असे फक्त नावात साम्य आहे. यावर विरोधक राजकिय पोळी भाजू पाहात आहेत. यासाठी मी स्वतः या प्रकरणाची सीआयडी मार्फत चाैकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

कोंबडी चोर म्हणाऱ्यांना कोंबडीची तंगडी आवडते अशी टीकाही श्री. खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली. 

loading image
go to top