न्यायालयाने सांगितले तर मी बंगला पाडेन: सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

याबाबत बोलताना सुभाष देशमुख म्हणाले, की परवानगी घेऊन बंगल्याचे बांधकाम केले आहे. मी कुणाचे हडपल नाही ,लुटले नाही कष्टाच्या पैश्याने बंगला बांधला आहे. एकाच पदावरील व्यक्ती आधी बांधकाम परवाना देते आणि पुन्हा परत कशी घेते. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. माझ्या नेत्यांनी सांगितले तरच राजीनामा देईन.

सोलापूर :  मी कुणाच हडपल नाही, लुटल नाही. कष्टाच्या पैशाने बंगला बांधला आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे. न्यायालयाने सांगितले तर मी बंगला पाडेन, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सुभाष देशमुख यांनी अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या बंगल्यांचा बांधकाम परवाना महापालिकेने परत घेतला आहे. सुभाष देशमुख यांच्यासह दहाजणांचे बंगले या जागेवर आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या रीट याचिकेवर १३ जूनला सुनावणी होणार आहे. आरक्षित जागेवर बांधकाम परवाना दिल्या प्रकरणी महापालिकेवर कारवाई करावी अशी महेश चव्हाण या सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार अहवाल देण्याचे आदेश आयुक्ताना दिले. मात्र त्याची कार्यवाही न झाल्याने नितीन भोपळे यांनी अवमान याचिका दाखल केली. त्यानुसार ३१ मे पुर्वी अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार आयुक्तानी अहवाल सादर केला आहे. सदरची बांधकाम परवानगी परत घेत असल्याचे त्यात म्हटले आहे.

याबाबत बोलताना सुभाष देशमुख म्हणाले, की परवानगी घेऊन बंगल्याचे बांधकाम केले आहे. मी कुणाचे हडपल नाही ,लुटले नाही कष्टाच्या पैश्याने बंगला बांधला आहे. एकाच पदावरील व्यक्ती आधी बांधकाम परवाना देते आणि पुन्हा परत कशी घेते. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. माझ्या नेत्यांनी सांगितले तरच राजीनामा देईन.

Web Title: Minister Subhash Deshmukh talked about bungalow issue