Vidhan Sabha 2019 : सुजात आंबेडकरांना अपघात; जिप्सीतून गेला तोल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

सोलापुरातील प्रचार रॅलीदरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांना अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असून माझी प्रकृती उत्तम असून पुढील नियोजित दौरे करणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे.

सोलापूर - सोलापुरातील प्रचार रॅलीदरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांना अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असून माझी प्रकृती उत्तम असून पुढील नियोजित दौरे करणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे.

सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रुपाभवानी मंदिर परिसरात त्यांची प्रचाररॅली होती. त्यावेळी, अचानक कार्यकर्ते गाडीसमोर आल्यामुळे ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी आपला बॅलन्स न करणे अशक्य झाल्याने सुजात आंबेडकर गाडीतील पुढील सीटवर पडले. या अपघातात त्यांच्या ओठाला किरकोळ जखम झाली, अशी माहिती सोलापूरचे वंचित बहुजन आघाडीचे प्रचारप्रमुख नगरसेवक गणेश पुजारी यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजप व शिवसेनेने जाहीर केलेले जाहीरनामे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी जुमलेच ठरणार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सोलापूर दौऱ्यावेळी केली. कोणाच्याही खात्यावर 15 लाख आले नाहीत. कोणत्याही शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही, आत्महत्या थांबल्या नाहीत, पाणीप्रश्न सुटला नाही, धनगरांना आरक्षण दिले नाही मग यावर्षी दिलेल्या जाहीरनाम्यातील कोणत्या गोष्टी पूर्ण होतील यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही, असेही सुजात आंबेडकर यांनी सोलापूरातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor accident of sujat ambedkar in solapur rally