वाहनपरवाना नसलेल्या अल्पवयीनांना एक हजाराचा दंड

किरण चव्हाण
गुरुवार, 17 मे 2018

माढा : वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याचे वय नसलेल्या मुलांच्या ताब्यात वाहन चालविण्यास दिल्याने माढा तालुक्यातील सहा जणांना माढा न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

माढा : वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याचे वय नसलेल्या मुलांच्या ताब्यात वाहन चालविण्यास दिल्याने माढा तालुक्यातील सहा जणांना माढा न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

कुर्डुवाडी पोलिसांनी माढा  तालुक्यातील उद्धव कुसमोडे (वय. 50) रा. भोसरे, ज्ञानदेव देडे (वय 47) रा. भोसरे, समीर बागवान (वय 43) रा. कुर्डुवाडी, विजयकुमार दोशी (वय 58) रा. कुर्डुवाडी, सोमनाथ सातव (वय 30), रा. म्हैसगाव, महादेव घुगे (वय 45) रा. लऊळ या सहा जणांनी वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याचे वय नसलेल्या मुलांच्या ताब्यात वाहन चालविण्यास दिल्याने कुर्डुवाडी पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध माढा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वरील सहा जणांनी आरोप मान्य केले.

न्यायाधीश एस. के. देवकर यांनी या सहा जणांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांना चांगलीच चपराक बसली आहे.

Web Title: minor child not having Driving Licence fined of rs one thousand