मिरज - कॅसलरॉक पॅसेंजर मार्चअखेरपर्यंत रद्द

मिरज - कॅसलरॉक पॅसेंजर मार्चअखेरपर्यंत रद्द

सांगली -  लोहमार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी आठ रेल्वे गाड्या मार्चअखेरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. मिरज ते कॅसलरॉक ( क्रमांक 51405 ) व कॅसलरॉक-मिरज ( 51406 ) पॅसेंजर 6 फेब्रुवारी ते 30 मार्चदरम्यान धावणार नाही. मिरज-बेळगाव ( क्रमांक 51461 ) आणि बेळगाव-मिरज पॅसेंजर ( क्रमांक 51464 ) 6 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान धावणार नाही.

सोलापूर-गदग डेमू ( क्रमांक 71303 ) आणि गदग-सोलापूर डेमू ( क्रमांक 71304 ) 6 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान रद्द राहील. विजयवाडा-बेंगलुरु ( क्रमांक 56503 ) आणि बेंगलुरु-विजयवाडा पॅसेंजर ( क्रमांक 56504 ) ही गाडीही या कालावधीत बंद राहील. पुणे-लोंढा लोहमार्गाचे रुंदीकरण आणि विद्युतीकरणाचे काम गतीने सुरु आहे. येत्या डिसेंबरपुर्वी काही गाड्या वीजेवर सोडण्याचे उद्दिष्ठ्य आहे. सध्या हा मार्ग एकेरी आहे.

रुंदीकरण कामासाठी वाहतुकीचे अडथळे येऊ नयेत म्हणून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय दक्षिण-पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यापुर्वी 10 जानेवारी ते 25 एप्रिलदरम्यान मिरज-बेळगाव-मिरज ही पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय झाला होता. बेळगाव-सांबरा-सुळेभावीदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ती रद्द झाली होती. आता आणखी काही गाड्या वाढवण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com