मिरज : मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला ; नीतेश राणे

मिरजेतील सभेत टीका; निरंजन आवटी यांचा वाढदिवस उत्साहात
Nitesh Rane News
Nitesh Rane Newssakal

मिरज : ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला,’’ अशी टीका भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी सोमवारी येथे केली. महापालिकेचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार राणे म्हणाले, ‘‘वडिलांना दिलेली शपथ पूर्ण करायची होती, म्हणून ठाकरेंनी भाजपचा पाठीत खंजीर खुपसला. (Nitesh Rane News)

एका बाजूला पवारसाहेब, दुसरीकडे काँग्रेसची पिलावळ राज्य करत आहे. शब्द देणे म्हणजे स्वतःसाठी मानसन्मान कमवण्यासारखे असते. भाजपला फसवून राज्यामध्ये सत्ता काबीज केली. हीच महाराष्ट्राला लागलेली पनवती आहे. महाविकास आघाडीला अडीच वर्षे झाली. परंतु विकासाला खीळ बसली आहे. भाजप तुमच्या पाठीशी आहे.’’ यावेळी आमदार सुरेश खाडे, दिनकर पाटील, सुमित कदम, सुरेश आवटी, संदीप आवटी, शेखर इनामदार, कुल्लोळी, बाबासाहेब आळतेकर, अजिंक्य हंबीर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com