राजकीय पाठबळामुळे मिरज शहर बनले 'कॅसिनो सिटी'

'आठ दिवसात पोलिस व जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरू'
sangli
sangliesakal
Summary

'आठ दिवसात पोलिस व जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरू'

सांगली : मिरजेत हप्तेखोरी आणि राजकीय पाठबळामुळे जुगार क्लब वाढू लागलेत. मिरज ‘कॅसिनो सिटी’ बनली असून सांगली आणि कुपवाडमध्येही क्लब वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मारूती चौकातून आवाज उठवला जाईल. (Miraj) आठ दिवसात पोलिस व जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरू. प्रसंगी न्यायालयीन लढाई लढली जाईल असा इशारा भाजपचे (BJP) प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. (Sangli News)

sangli
चंद्रकांतदादा म्हणतात, बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय...

ते म्हणाले, 'मिरजेत आठवड्यापूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेला हादरा देणाऱ्या घटना घडल्या. कर्नाटकातून आलेले अडीच कोटीचे चंदन पकडले गेले. त्यामुळे चंदन तस्करीची साखळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. (Crime news) दुसऱ्या घटनेत जुगार अड्डयावर दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणातील तक्रार दाखल होताना मारामारीचे ठिकाण व कारण बदलण्यासाठी दबाव निर्माण केल्याची माहिती पुढे येते. १९९० ते २००५ पर्यंत मिरज शहर हे चंदन, मानवी तस्करीचे केंद्र होते. पुन्हा एकदा मिरजेची कॅसिनोसिटी अशी ओळख बनली आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे (National Highway) जमिनी गेलेल्या अनेकांना कोट्यवधी रूपयांची भरपाई मिळाली. आता रात्रीत कोट्यधीश बनलेल्या तरूणांना व कर्त्या पुरूषांना जुगार अड्डयांची भुरळ घालून राजरोस लुटले जात आहे.'

ते पुढे म्हणाले, 'मिरजेतील तस्करी आणि जुगार क्लब हप्तखोरी आणि राजकीय पाठबळामुळे वाढले आहेत. राजकीय आशीर्वादाने ही कीड फोफावत चालली आहे. हे चित्र असेच सुरू राहिले तर महापालिका क्षेत्र म्हणजे जुगार, चंदन तस्करीसह विविध गुन्हेगारांचे शहर होण्यास वेळ लागणार नाही. ऐतिहासिक मिरज शहर बदनाम झाले असून सांगली व कुपवाडला देखील ही कीड लागल्याशिवाय राहणार नाही. जुगार क्लबप्रकरणी आमच्याकडे काही तक्रारी आल्या आहेत. पोलिस आणि जिल्हा प्रशासन दडपणाखाली वावरत असल्याची परिस्थिती आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांवर शिरजोरी करण्याचा प्रकार यापूर्वी मिरजेत घडले आहेत. त्यामुळे आता मिरजेसह सांगली-कुपवाडमधील अवैध धंदे बंद करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देत असून त्यानंतर रस्त्यावर उतरून लढाई करू.'

sangli
Pushpa स्टाईलमध्ये 'झोमॅटोचं' प्रमोशन, अल्लु अर्जुन 'फायर'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com