मिरज-कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण वेगात

मिरज-कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण वेगात

सांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. विद्युतीकरण दृष्टिक्षेपात आल्याने प्रवाशांत उत्साहाचे वातावरण आहे. 

मिरज ते जयसिंगपूर, रुकडी, हातकणंगले, कोल्हापूर या टप्प्यात अनेक ठिकाणी विद्युतीकरणाची प्राथमिक कामे पूर्ण झाली आहेत; फक्त वीजवाहिनी जोडणे बाकी आहे. लोहमार्गाच्या बाजूने विजेचे खांब टाकण्यात आलेत. त्यावर वीजवाहिनी पेलण्यासाठी आडवे हॅंगरही टाकलेत. 

पेण्टाग्राफची कामे पूर्ण झालीत. वीजवाहिनी टाकली, की काम पूर्ण. वीजपुरवठ्यासाठी मिरजेत वीजउपकेंद्राचे काम गतीने सुरू आहे. दुसरे उपकेंद्र रुकडी ते हातकणंगले या दरम्यान उभे केले जाणार आहे. तेथेही ट्रान्सफार्मर आणून ठेवला आहे. सुरुवातीला महावितरणकडून वीज घेतली जाईल. भविष्यात केंद्रीय ग्रीडकडून पुरवठा होईल. 

मिरज - पुणे, मिरज - लोंढा अपूर्ण  
मिरज ते पुणे व मिरज ते लोंढा लोहमार्गांचे विद्युतीकरण अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे मिरज ते कोल्हापूर विद्युतीकरण झाले तरी तेथून विजेवरील गाड्या सोडता येणार नाहीत. मिरज-पुणे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच कोल्हापुरातून लांब पल्ल्याच्या गाड्या विजेवर धावू शकतील. कामाची सध्याची गती पाहता ऑगस्ट-सप्टेंबर उजाडू शकतो. विजेवरील रेल्वे धावू लागल्यानंतर मिरज-कोल्हापूर प्रवासाचा वेळ कमी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com