मिरज - कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने

संतोष भिसे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मिरज - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गतीने सुरु झाले आहे. जयसिंगपूरपर्यंत खांब उभे झाले आहेत. पुढे कोल्हापूरपर्यंत काम गतीने सुरु आहे. पुणे - मिरज - लोंढा मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचा एक भाग म्हणून हे काम सुरु आहे. 2021 पर्यंत मिरज - कोल्हापूर दरम्यान विजेवरची गाडी पळवण्याचे उद्दिष्ट आहे. 

मिरज - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गतीने सुरु झाले आहे. जयसिंगपूरपर्यंत खांब उभे झाले आहेत. पुढे कोल्हापूरपर्यंत काम गतीने सुरु आहे. पुणे - मिरज - लोंढा मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचा एक भाग म्हणून हे काम सुरु आहे. 2021 पर्यंत मिरज - कोल्हापूर दरम्यान विजेवरची गाडी पळवण्याचे उद्दिष्ट आहे. 

पुणे ते मिरज ( 279 किलोमीटर ) आणि मिरज ते लोंढा ( 180 किलोमीटर ) मार्गाचे दुहेरीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे. विद्युतीकरण नंतर सुरु होईल. कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण आत्तापासूनच सुरु झाले आहे. त्याचे साहित्य मिरजेत मोठ्या प्रमाणात येऊन पडले आहे. या मार्गाचे दुहेरीकरण रेल्वेच्या आराखड्यात नाही. हा मार्ग "शॉर्ट रुट" असल्याने दुहेरीकरण तुर्त आवश्‍यक नाही असा प्रशासनाचा दावा आहे. फक्त विद्युतीकरण करुन गाड्यांची गती वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

कोल्हापुरातून सध्या दररोज आठ एक्‍सप्रेस व पाच पॅसेंजर गाड्या सुटतात. याउलट मालवाहतुकच मोठ्या प्रमाणात होते. प्रवासी वाहतुक कमी असल्याने मालगाड्या रखडत नाहीत; त्यामुळे दुहेरीकरण रेल्वेच्या प्राधान्यक्रमावर नाही. दुहेरीकरण झाल्यानंतर गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी पुरेशी जागाही नाही. मार्केट यार्डात वैभववाडी मार्गासाठी जंक्‍शनचे नियोजन आहे; त्यामुळे भविष्यात सर्व मालवाहतुक नव्या वैभववाडी मार्गावरुन वळवली जाऊ शकते. त्यामुळे मिरज- कोल्हापूर दुहेरीकरण तुर्त व्यवहार्य नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुणे-मिरज मार्गाचे विद्युतीकरण 2021 पर्यंत पुर्ण होईल. सध्या सातारा-कोल्हापूर प्रगतीपथावर आहे; पुणे-सातारा लवकरच गतीने सुरु होईल. त्यानंतर गाड्यांचा वेग व वारंवारीता आणि नव्या गाड्या सुरु होतील. विद्युतीकरण पुर्ण होताच कोल्हापुरातूनही विजेवर पळणारी इंजिने मिरजमार्गे धावतील. 

मिरज-कोल्हापूर शतकोत्तरी प्रवास
कोल्हापूर-मिरज लोहमार्ग 1891 मध्ये सुरु झाला. ब्रॉडगेजमध्ये रुपांतर 1971 मध्ये झाले. 2021 मध्ये त्याला अनुक्रमे 130 आणि 50 वर्षे पुर्ण होत आहेत. तेव्हा विजेवरच्या गाड्या धावणार असून कोल्हापुरकरांसाठी ती अनोखी भेट ठरेल.
 

Web Title: Miraj - Kolhapur Rail Track Electrification