बेबीकॉर्न उत्पादनात राज्यात मिरजेची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

सांगली - ऊस, द्राक्षे, हळदीत ठसा उमटवल्यानंतर शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. बेबीकॉर्न उत्पादनात राज्यात मिरज तालुका आघाडीवर आहे. माळरानावरही कमी पाण्यात ठिबकने बेबीकॉर्न बहरत आहे. 

सांगली - ऊस, द्राक्षे, हळदीत ठसा उमटवल्यानंतर शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. बेबीकॉर्न उत्पादनात राज्यात मिरज तालुका आघाडीवर आहे. माळरानावरही कमी पाण्यात ठिबकने बेबीकॉर्न बहरत आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेचे धडे देत पुन्हा वेगळी वाट चोखाळली आहे. बेबीकॉर्न व स्वीटकॉर्नने दहा हजार एकर क्षेत्र व्यापलेय. 

कमी कालावधी, शेती औषधांची गरज नाही, देश-परदेशात चांगली मागणी यामुळे लागवड वाढत आहे. प्रत्येक गावात किमान २५ हेक्‍टरवर बेबीकॉर्न लावण्याची सूचना जिल्हा कृषी विभागाने केली आहे. कणसांचा वापर भाजून, शिजवून खाण्यासाठी होतो. चायनीजमध्येही वापर वाढला आहे. शाकाहारी, मांसाहारी ग्रेव्हीमध्ये सर्रास वापरले जाते. भजीच्या पीठातही त्याचे पीठ मिसळले जाते. जगभरात सत्तरहून अधिक देशांत मागणी आहे. यापूर्वी चीनची मक्तेदारी होती. पण अतिपाऊस, थंडीमुळे तेथून पुरवठा कमी झाला. परिणामी भारतातून निर्यात वाढली आहे. दरवर्षी १४ टक्‍क्‍यांनी मागणी वाढल्याचे निरीक्षण आहे.

पुण्याची आघाडी
मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील शेतकरी याकडे वळले आहेत. पुणे, फलटण, पन्हाळा येथेही लागवड होत आहे. पुणे आघाडीवर आहे.

‘‘शेतकऱ्यांना बियाणे, खते देऊन बेबीकॉर्न उत्पादनासाठी उत्तेजन देतो. हमखास पैसे देणारे पीक असल्याने  शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. साठ दिवसांत एकरी किमान पन्नास हजार रुपये मिळतात. यंदा आम्ही रशियाला निर्यात करत आहोत.  
- अशोक विभूते,
आबासाहेब पाटील, 
संचालक, रयत फार्मर्स कंपनी, आरग.

‘‘बेबीकॉर्न आणि स्वीटकॉर्न लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. कराड परिसरात आत्मा योजनेतून क्‍लस्टर बेबीकॉर्नचे विकसीत करीत आहोत. मिरजेतील शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेतून आघाडी घेतली आहे.’’
- मनोज वेताळ, 

उपविभागीय कृषी अधिकारी

असे आहे अर्थकारण...
- एकरी गुंतवणूक - १० हजार रुपये
- उत्पादन - एक हजार किलो
- सरासरी उत्पन्न - ५० हजार रुपये
- वैरण - दहा हजार रुपये
- निव्वळ नफा - ५० हजार रुपये 
- सकस वैरणीने दुधाची वाढ व स्निग्धांश वाढ हे अप्रत्यक्ष फायदे

Web Title: miraj lead in state in sweet corn production

टॅग्स