लॉटरीच्या नावाखाली तेरा लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मिरज - तेरा लाखांची रोख रक्कम किंवा टाटा सफारी गाडी यापैकी कोणतेही एक बक्षीस देण्याचे आमिष दाखवून येथील शहाजहान अमिर मुजावर (विश्रामबाग, सांगली) यांना तब्बल तेरा लाखांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याची तक्रार आज महात्मा गांधी पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी मुजावर यांना फसवणाऱ्या चौघा परप्रातिंयाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

एका महाविद्यालयात अकौटंट पदावर कार्यरत शहाजहान यांना आपण लकी नंबर विजेते आहात. लॉटरी लागल्याचे त्यांना मोबाईलवर सांगण्यात आले. तेरा लाख रुपये रोख किंवा बारा लाख ऐंशी हजारांची टाटा सफारी यापैकी एकाची निवड करावी लागेल. त्यासाठी काही कागदपत्रांसह काही रक्कम स्टेट बॅंकेतील खात्यावर जमा करावी लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. मुजावर यांच्याशी चौघांनी वेगवेगळी चर्चा केली. आपली नावे राहुल सिन्हा, मनोज पांडे, विनोद कुमार आणि राहुल कुमार अशी सांगितली. त्यांनी खाते नंबर देऊन मुजावर यांना पैसे मिरजेच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत भरण्यास सांगितले. मुजावर यांनी वेळोवेळी तेरा लाख पाठवले. हा व्यवहार 10 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान झाला. या चौघांनी वेगवेगळ्या नंबरवरून मुजावर यांना फोनही केलेत. मुजावर यांनी चारही नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला; पण फोन बंद आहेत. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

Web Title: miraj news crime

टॅग्स