मिरजेत दोन इंजिनांची नवी लोकल दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मिरज - मिरजेतून सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर मार्गावर लोकल सोडण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. पुण्याहून पहिली लोकल आज पहाटे मिरजेत दाखल झाली. आणखी दोन लोकल गाड्या दोन दिवसांत येणार आहेत. 

पुणे स्थानकातून पहिली डिझेल मल्टी इंजिन (डीएमई) गाडी आज मिरजेत फलाट क्रमांक सहावर आली. गाडी येणार असल्याचा संदेश पुण्यातून मिळाल्यानंतर हा फलाट प्रशासनाने रिकामा केला. आज दुपारी लोकल गाडी यार्डात हलविण्याचे काम सुरू होते. 

आणखी दोन लोकल दाखल होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बारा डब्यांच्या गाड्या आहेत. त्या कोठे सोडायच्या, याबाबत निश्‍चित निर्देश मिरजेत मिळालेले नाहीत. मिरजेतून सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा मार्गावर लोकल सोडल्या जाण्याची शक्‍यता आहे. सध्या सोलापूर मार्गावर मिरजेतून सकाळी सुटणारी गाडी नाही. प्रवाशांची मोठी मागणी असतानाही गाडीची सोय झालेली नाही. वर्षभरापूर्वी सोलापूर मार्गावर लोकलची चाचणी अयशस्वी ठरली होती. त्यानंतर नव्या लोकलची प्रतीक्षा सुरू होती. आज आलेली लोकल सकाळच्या वेळेत सोलापूरसाठी सोडल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. सांगली- मिरज- कोल्हापूर मार्गावर सकाळी साडेआठनंतर सव्वाअकरापर्यंत गाडी उपलब्ध नाही. त्या वेळेत लोकल सोडता येणार आहे. दरम्यान, तिन्ही लोकल गाड्या दाखल झाल्यानंतर काही दिवस चाचण्या होतील; मग वेळापत्रक व अन्य बाबी निश्‍चित होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आकर्षक रचना 
चौदा डब्यांची लोकल निळसर-करड्या रंगाची आहे. नव्याने रंगरंगोटी केल्याने आकर्षक दिसत आहे. डिझेलवर धावणारी दोन इंजिने आहेत. डब्यांची अंतर्गत रचना सुटसुटीत आणि हवेशीर आहे. एका आसनावर तीन प्रवासी बसू शकतात. उभे राहणाऱ्यांसाठी छताला हॅण्डलची सोय आहे. बॅगा किंवा साहित्य ठेवण्यासाठी पुरेशा रुंदीची कॅरेज आहेत. प्रत्येक डब्याला एक स्वच्छतागृह आहे. दरवाजे सरकणारे आहेत. कोयना एक्‍स्प्रेस किंवा इंटरसिटी एक्‍स्प्रेसच्या डब्यांसारखी त्यांची रचना आहे.

Web Title: miraj news DME