मिरज-पंढरपूर मार्गावर वारीसाठी यंदा जादा रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trains

मिरज-पंढरपूर मार्गावर वारीसाठी यंदा जादा रेल्वे

मिरज : विठ्ठलाच्या भेटीसाठी यंदा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून वारी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे स्थगित आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी यंदा मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाकडून तीन पॅसेंजर गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांची अल्पदरात पंढरीची वारी होणार आहे. यामध्ये मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डुवाडी आणि मिरज-पंढरपूर या तीन गाड्या ५ ते १४ जुलैपर्यंत धावणार आहेत.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे रद्द करण्यात आलेली आषाढी यात्रा यंदा लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापूर आणि पुणे रेल्वे विभागाकडून वारीसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांना जनरल तिकीट सुविधा लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना तिकिटे रिझर्व्हेशन करता पंढरपूरला जाता येणार आहे.

गेली दोन वर्षे बंद असलेल्या मिरज-बेळगाव, मिरज लोंढा या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वेच्या हुबळी विभागाकडून घेण्यात आला आहे. यामुळे जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात मिरज-लोंढा, मिरज-बेळगाव, बेळगाव-मिरज, लोंढा-मिरज या पॅसेंजर गाड्या धावणार आहेत. वारीच्या अनुषंगाने या गाड्या सुरू होणार असल्यामुळे कर्नाटकातील भाविकांना यंदा आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

मिरज-पंढरपूरचे वेळापत्रक

मिरजेतून पहाटे ५ वाजता सुटेल. आरग ५ः२५, बेळंकी ५ः२७, सलगरे ५ः४६, कवठेमहांकाळ ६ः००, लंगरपेठ ६ः१३, ढालगाव ६ः२३, जत रोड ६ः४५, म्हसोबा डोंगरगाव ६ः५९, जावळे ७ः०६, वासूद ७ः१५, सांगोला ७ः२८ आणि पंढरपूर येथे सकाळी ८ः२५ वाजता पोहोचेल.मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी वेळापत्रक

मिरजेतून दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटेल. आरग ३ः३०, बेळंकी ३ः४३, सलगरे ३ः५३, कवठेमहांकाळ ४ः०५, लंगरपेठ ४ः१९, ढालगाव ४ः२८, जत रोड ४ः४८, म्हसोबा डोंगरगाव ४ः५९, जावळे ५ः०६, वासूद ५ः१५, सांगोला ५ः२८ आणि पंढरपूर येथे सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. ही गाडी कुर्डुवाडीपर्यंत जाईल.

Web Title: Miraj Pandharpur Route Trains Scheduled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..