मिरजेत रस्ते निर्मनुष्य; डांबरीकरण कामांना वेग 

Miraj roads uninhabited; Speed ​​up asphalting works
Miraj roads uninhabited; Speed ​​up asphalting works

मिरज : कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचा फायदा मिरज शहरातील रस्ते विकास कामांना चांगलाच होत आहे. शहरातील निर्मनुष्य रस्त्यांमुळे रस्ते डांबरीकरण वेगाने होत आहे. रहदारी नसल्याने ट्रॉफिक जाम होण्याची समस्या निर्माण होत नाही. परिणामी दोन ते पाच तासांत किमान 500 मीटर पर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण वेगाने होत आहे. 

मागील लॉकडाऊनमध्ये अमृत योजनेची खोदाई महापालिकेकडून झाली तर आता रस्ते डांबरीकरण युद्ध पातळीवर होत आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांत किमान दोन किलोमीटर पर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण महापालिकेकडून पूर्ण झाले आहे. पुढील महिन्याभरात पावसाळा सुरू होत असल्याने खराब रस्ते जलद गतीने करण्याचा प्रयत्न महापालिकेचा दिसत आहे. 

तसेच स्वच्छता विभागाकडून देखील रस्ते नियमित चकाचक केले जात आहेत. ऐरवी सकाळी केलेली शहरातील रस्त्यांची स्वच्छता दुपारपर्यंत अस्वच्छ व्हायची मात्र आता शहरातील रस्ते दिवसभर चकाचक दिसत आहेत. शिवाय औषध फवारणी देखील जलद गतीने सुरू आहे. निर्मनुष्य हायस्कूल रोड, स्टेशन रोड, लक्ष्मी मार्केट, दत्त चौक, गाडवे चौक आदी प्रमुख मार्गावर विकेंड लॉकडाऊनमध्ये औषध फवारणी सुरू आहे. 
 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com