मिरज - रुकडी दरम्यान आज संध्याकाळी धावणार पॅसेंजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मिरज - मिरज ते रुकडी दरम्यान पहिली पँसेंजर रेल्वे आज संध्याकाळी 4.50 वाजता मिरजेतून सोडली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मिरज - मिरज ते रुकडी दरम्यान पहिली पँसेंजर रेल्वे आज संध्याकाळी 4.50 वाजता मिरजेतून सोडली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरस्थितीमुळे मिरज-कोल्हापूर दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे.  गेले आठवडाभर या मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे. रुकडीजवळ रुळांवर पंचगंगेचे पाणी आल्याने खडी वाहून गेली आहे. काल एका स्वतंत्र ट्रॉलीतून तज्ञांनी पाहणी केली. मिरज ते रुकडीदरम्यान कृष्णा नदीवर अंकली पुलाजवळ पाण्याची पातळी जास्त आहे, पण ती धोकादायक नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला. वाहतूक सुरु करण्यास ग्रीन सिग्नलही दिला,  त्यानंतर पहिली पँसेंजर आज संध्याकाळी मिरजेतून रवाना होईल. ती रुकडीपर्यंतच जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj - Rukadi Passenger departing this evening