मिरज वाहतूक पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात 

मिरज वाहतूक पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात 

सांगली - लाकूड वाहतुकीचा टेंम्पोवर कारवाई टाळण्यासाठी तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी मिरज वाहतूक शाखेतील पोलिस महेश पोपट कांबळे व त्याचा मित्र नंदकुमार संजय सर्वदे यास अटक केली आहे. मिरजेतील बसस्थानक परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

अधिक माहिती अशी, महेश याने 9 सप्टेंबरला तक्रारदारांचा लाकूड वाहतुकीचा टेंम्पो अडवला. कारवाई टाळण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. त्यावेळी दोन हजार रूपये घेतले. उर्वरित तीन हजार रूपये नंदकुमार सर्वदे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

तक्रारीची पडताळणी करून बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांनी सर्वदे याच्याकडे तीन हजार देताना रंगेहात पकडले. त्यानंतर कांबळे यालाही अटक केली. दोघांविरोधात महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लाचलुचपतचे अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक राजेंद्र तेंडुलकर, कर्मचारी अविनाश सागर, जितेंद्र काळे, बाळासाहेब पवार, संग्राम पाटील, मयुर देसाई यांनी ही कारवाई केली. 

तक्रारीसाठी "टोल फ्री' क्रमांक 
शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी आता 1064 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. याशिवाय 0233-2373095 किंवा 7875333333 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com