मिरजकर सजग; विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद

Mirajkar alert; Response to Weekend Lockdown
Mirajkar alert; Response to Weekend Lockdown

मिरज : गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी दिलेल्या वेगवेगळ्या शिक्षांचा सोशल मिडीयावर पाऊस पडत होता. नागरिक विनाकारण क्षुल्लक कारणांसाठी मिरज शहरात भ्रामंती करत होते आणि पोलिसांच्या शिक्षेला सामोरे जात होत. यंदा विकेंड लॉकडाऊनमध्ये नागरिक सजग झाल्याचे चित्र दिसले. शासनाच्या ब्रेक द चेन मोहिमेसाठी नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या लॉकडाऊनमध्ये विना कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडताना दिसले नाहीत. 

पोलिसांच्या काठीचा प्रतिसाद यंदा कोणालाच मिळाला नाही. पोलिसदादांचा ताण कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेत थोडा बहुत कमी झाला. सकाळ सत्रात दुचाकींची संख्या अधिक वाढल्याचे दिसताच पोलिसांकडून चौकशी केली जाते. हीच परिस्थिती सायंकाळी होती.

एमआयडीसीतील कामगार, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय परिचारक, पोलिस यंत्रणा वगळता कोणीच रस्त्यांवर दिसले नाही.  शासन आदेशाचे विकेंड लॉकडाऊनमध्ये तंतोतंत पालन केले जात आहे. रेल्वे सेवा सुरू असल्याने स्थानक परिसर वगळता शहरात इतर सर्वत्र शुकशूकाट पाहण्यास मिळाला. 

विकेंड लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गास थोडातरी ब्रेक लागेल. वाढती रूग्ण संख्या पाहता घरीच राहणे गरजेचे आहे. नोकरदार, नागरिक, कामगारांना सोयीचे झाले. 
- गजेंद्र कुल्लोळी, अध्यक्ष, व्यापारी आघाडी भाजपा 

विनाकारण बाहेर फिरणा-यांची संख्या विकेंड लॉकडाऊनमध्ये घटली. सबळ कारण असेल तरच बाहेर पडावे असे प्रशासनाचे मत आहे. तुरळक नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 
- अनिल माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा मिरज, 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com