esakal | मिरजकरांनी ठरवलं....गणेशोत्सव साधेपणानेच 
sakal

बोलून बातमी शोधा

Mirajkar decided .... Ganeshotsav simply

कोरोना संसर्ग परिस्थितीत दक्षता घेत मिरजकरांनी यंदा 90 टक्के गणरायांचे ऑनलाईन बुकींग केले आहे. यामुळे गणेश चतुर्थी दिवशी होणारी गर्दी टाळण्याचा प्रयत्न मिरजकरांनी केला आहे.

मिरजकरांनी ठरवलं....गणेशोत्सव साधेपणानेच 

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज : कोरोना संसर्ग परिस्थितीत दक्षता घेत मिरजकरांनी यंदा 90 टक्के गणरायांचे ऑनलाईन बुकींग केले आहे. यामुळे गणेश चतुर्थी दिवशी होणारी गर्दी टाळण्याचा प्रयत्न मिरजकरांनी केला आहे. मिरजतील सार्वजनिक आणि घऱगुती गणरायांची प्रतिष्ठापणा मोठ्या उत्साहात केली जाते. 

आगमनादिनी मोठ-मोठ्या मुर्तींची प्रतिष्ठापणा, मिरवणूका,ढोल-ताशे, बॅड-बाजा, पारंपारिक वाद्ये यांची रेलचेल असते यंदा मात्र या सर्वच गोष्टींना फाटा देत उत्सव साधेपणान साजरा करण्यावर मिरजकर ठाम आहेत. तर सार्वजनिक गणरायांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूका न काढता शांतते होईल. प्रशासनाकडून देखिल अशा सुचना मंडळांना दिल्या आहेत. मिरज गणेश विसर्जन सोहळा पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भक्तांना आकर्षित करणारा ठरतो मात्र गेल्यावर्षी महापूर आणि यंदा कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भावमुळे सलग दुस-या वर्षी उत्सव साधेपणाने करण्याचा संकल्प मंडळांनी केला आहे. कोरोनामुळे शहरातील बाजार पेठेत देखिल गर्दी तुरळक आहे. तर चीन वस्तूंवर नागरिकांनी पुर्णता बहिष्कार टाकला आहे. 

तसेच यंदा सार्वजनिक मंडळांनी गणरायांची प्रतिष्ठापणा घरीच करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सजावटीचा डाम-डौल टाळणार आहे. यामुळे मंडप व्यवसायिक, ईलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानदारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. तर तरूणाईचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेल्या ढोल-ताशा मंडळांवर देखिल उपास मारीची वेळ आली आहे. तर बॅड पथकावर मे महिन्यातील लग्न सराई सुपरी विना गेला. यानंतर गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात बॅंड-बॅजो वाल्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते मात्र आगमन आणि वसर्जन मिरवणूकीवर प्रशासनाकडून बंदी आल्यामुळे पुन्हा या पथकांवर रोजगारा विना उपासमार होणार हे मात्र निश्‍चित आहे. 

आवाढव्य मुर्तींना बगल 
प्रशासनाकडून मंडळांना किमान चार फुट उंचीच्या मुर्तींची प्रतिष्ठापणा करण्याची विनंती केली आहे. यामुळे यंदा वेगवेगळ्या आकारांच्या मोठ्या मुर्तीना बगल देण्यात आला आहे. तसेच घरगुती गणराय दोन फुट उंचीचे असावेत अशी नियमावली प्रशासनाकडून प्रसिध्द केली आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार

loading image
go to top