जावळीत डॉक्‍टरांअभावी जनावरांचे हाल

misery animals Due to the absence of doctors
misery animals Due to the absence of doctors

केळघर : जावळी तालुक्‍याच्या पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांची पाच, तर शिपायांची नऊ पदे रिक्त असल्याने पशुपालकांना जनावरांवर उपचार करण्याबाबत गैरसोय होत आहे. त्यांना प्रसंगी जनावरांवर उपचार करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.     

तालुक्‍यात मेढा, कुडाळ, केळघर हे तीन पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी एकचे आहेत. त्यापैकी कुडाळ, केळघर येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत, तर श्रेणी दोनच्या केडंबे, मालचौंडी, हुमगाव येथे पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तद्वत शिपायांची एकूण १४ पैकी नऊ पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने तालुक्‍यातील पशुसंवर्धन विभागाचा गाडा चालवणे अशक्‍य झालेले आहे.

केळघर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक दर्जाचा असून, विभागातील 15 ते 20 गावांतील शेतकरी या दवाखान्यावर अवलंबून आहेत. मात्र, येथील पशुवैद्यकीय अधिकारी हे गेल्यावर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून शासनाकडून येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने ग्रामीण भागातील पशुपालकांच्या जनावरांचे मोठे हाल होत आहेत. केळघर विभागात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यातच या विभागात पशुधनही चांगले आहे. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी देणे गरजेचे असतानादेखील शासनाकडून वेळकाढूपणा होत असून, जर जनावरांवर उपचार करायला पशुवैद्यकीय अधिकारीच नसतील तर असे दवाखाने काय कामाचे आहेत? व ते कुणासाठी आहेत, असा सवाल वरोशीचे उपसरपंच सुरेश कासुर्डे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, जावळी तालुक्‍यामध्ये पशुवैद्यकीय विभागात काही ठिकाणी एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे दोन-दोन दवाखान्यांचा कार्यभार सोपवण्यात आल्याने पशुपालकांना सेवा देताना या अधिकाऱ्यांचीही दमछाक होताना दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शेतकरी व पशुपालकांना उत्तोमत्तम सेवा देण्यासाठी शासनाने हातभार लावावा, अशी मागणी जावळी तालुक्‍यातून होत आहेत.

जावळी तालुक्‍यात पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. रिक्त पदे भरण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे. ही रिक्त पदे शासनाने भरण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे तालुक्‍यातील पशुपालकांच्या जनावरांना चांगली सेवा देणे शक्‍य होईल.
-डॉ. पी. एस. घोडके, विस्तार अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, जावळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com