कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड डांबरीकरणासाठी आमदार रस्त्यावर

 कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड डांबरीकरणासाठी आमदार रस्त्यावर

फुलेवाडी - फुलेवाडी रिंगरोडचे डांबरीकरण काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी आमदार अमल महाडिक यांनी आज उपोषण केले. त्यांच्या उपोषणाची दखल घेत महापालिकेने रस्त्यासह पथदिवे दुरुस्ती व गळती काढण्याचे साहित्य आणून काम सुरू केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत या वेळी उपस्थित होते. शनिवारपासून काम नियमितपणे सुरू ठेवण्याचे लेखी आश्‍वासन घेतल्यानंतर रात्री नऊ वाजता उपोषण मागे घेण्यात आले.

नगरोत्थान योजनेतून फुलेवाडी रिंगरोड (बोंद्रेनगर)चे डांबरीकरण मंजूर आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून काम रखडले आहे. त्याच्या निषेधार्थ आमदार महाडिक गंगाई लॉन शेजारी कार्यकर्त्यांसमवेत सकाळी अकरा वाजता उपोषणास बसले. आमदार महाडिक म्हणाले, ‘‘कळंबा रोड ते साई मंदिर, नवीन वाशी नाका, आपटेनगर पाण्याची टाकी ते फुलेवाडी नाक्‍यापर्यंतच्या मार्गाचे डांबरीकरण पाच वर्षांपासून रखडले आहे. महापालिकेने काम सुरू करावे, याबाबत अनेकदा निवेदने दिली; परंतु कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.’’

विजयसिंह देसाई म्हणाले, ‘‘फुलेवाडी रिंग रोड रस्ता डांबरीकरणासाठी लोकांनी पाच वेळा आंदोलने केली; परंतु काम पूर्ण झाले नाही. काम रखडण्यास दक्षिणचे राजकारण कारणीभूत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आमदार महाडिक यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.’’

यावेळी भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई, अमोल माने, कुलदीप सावरतकर, अविनाश कुंभार, राजू जाधव, पी. एन. भवड, महेश गायकवाड, शोभा कोळी, पूनम सुळगावकर, लता बर्गे, सरिता कोळी, स्वाती कदम आदी उपोषणात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com