आमदार भालके यांनी केले काकासाहेब शिंदे यांच्या परिवाराचे सांत्वन

bhalke
bhalke

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे जाऊन पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून 1 लाख रुपयांची रोख मदतही त्यांनी केली आहे. आता मरायचं नाही आता लढायचं आहे. आपल्या हक्कासाठी लढायाला तयार राहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी  संभाजी ब्रिगेड पंढरपूर किरणराज घाडगे, शालिवाहन कोळेकर, संदिप पाटील, सतिश वेताळ, योगेश औताडे, विलास औताडे, काकासाहेब पाटील, गणेश शिंदे,बाळासाहेब जाधव, उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांना महापुजेस विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची  पोलिसांनी पंढरपूरमध्ये धरपकड सुरू केल्यानंतरही आमदार भालके यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सर्वात प्रथम मला अटक करा मग मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना हात लावा अशी रोखठोक भूमिका आमदार भालके यांनी घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com