'पांडुरंगाच्या नगरीतील संस्कार असल्याने तोलून मोलून बोलतो'

Bharat Bhalke
Bharat Bhalke

मंगळवेढा : सध्याच्या काळात लोकप्रतिनिधीकडून अर्वाच्य भाषा बोलली जात असताना माझ्यावर मात्र पांडुरंगाच्या नगरीतील संस्कार असल्याने शिवाय माझ्यावर कबीराचा दुवा असल्याने मी तर तोलून मोलून बोलत आहे. शक्यतो मोबाईलवरून अधिक बोलणे तर टाळतोच, असे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले.

श्रमदानातून पाणी फौऊडेशनच्या सहकार्याने राज्यात यश मिळाल्याबाबत व सकाळ रिलीफ फंडातून केलेल्या कामातून तालुक्यातील आसबेवाडी येथे केलेल्या आयोजित केलेल्या कतृज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर सहयोगी संपादक अभय दिवाणजी, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, प्रणव परिचारक, सुरेश कोळेकर, पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, तहसिलदार आप्पासाहेब समींदर, तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड, बाळासाहेब आसबे, सुरेश पवार, सुहास पवार, भागवत भुसे, धनाजी बिचुकले, वसीम शेख, श्रीनिवास गंगणे आदीसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना भालके म्हणाले, सध्या काळात होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमात मी तर सर्वाची नावे घेत असतो पण एखाद्याचे नाव घेण्याचे विसरल्यावर मात्र दहा मते कमी होत असल्याची खंत व्यक्त करत सध्याच्या काळातील माध्यमातील एक विरोधातील बातमी रात्रणं दिवस झोपू देत नाही, हे सारे फेसबुक व व्हाॅटसअॅपमुळे हे शक्य झाले असले तरी हा झालेला बदल शेवटी आपण स्विकारलाच आहे. सकाळ माध्यम समुहाच्या दुष्काळ गावातील दुष्काळ हटविण्यासाठी केलेल्या दानशुरपणाबद्दल त्यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com