दिलीपराव माने यांनी इनोव्हा बनली रुग्णवाहिका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

माने यांनी त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून त्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला धावले. माने मालक नेहमीच इतरांना रोजगार देऊन त्यांची पोट भरण्यासाठी तत्पर असता आज मात्र, तुम्ही एकाचा जीव वाचविण्यासाठी आपली लाखो रुपयांची गाडी तात्काळ उपलब्ध केली.

सोलापूर : सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने हे मोहोळ तालुक्यातील कामती येथे एका लग्न समारंभासाठी जात होते. दरम्यान कामतीजवळच गंभीर अपघात झाला. एक जण दगावला तर एकजण गंभीर झाला. तेथील आरोग्य केंद्रात डॉक्टर नव्हते. तेथे रुग्णवाहिका पण नव्हती. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता दिलीपराव माने यांनी आपल्या इनोव्हा गाडीतून त्या दोघांनाही तात्काळ सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविले.

माने यांनी त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून त्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला धावले. माने मालक नेहमीच इतरांना रोजगार देऊन त्यांची पोट भरण्यासाठी तत्पर असता आज मात्र, तुम्ही एकाचा जीव वाचविण्यासाठी आपली लाखो रुपयांची गाडी तात्काळ उपलब्ध केली. तुमचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. अशी प्रतिक्रिया उपस्थित लोकांनी दिली.

Web Title: MLA Dilip Mane help people in Solapur