'सोपल-राऊत यांची भेट राजकीय चष्म्यातून पाहू नये'

barshi
barshi

बार्शी : संपूर्ण महाराष्ट्रात बार्शी तालुका राजकीय दृष्ट्य काटो की टक्कर असणारा व संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मागील वीस वर्ष पासून आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील राजीकय वैर टोकाचे आहे. भगवंत मोहोत्सवच्या निमित्ताने एकमेका समोर आलेल्या दोन्ही नेत्यांच्या फुगडी खेळणे व गाळ भेटीने सध्या जिल्यात सर्वत्र चर्चाना उधाण आले असून या घटनेकडव राजकीय चष्म्यातूम न पाहता दोन व्यक्तींची भेट म्हणून पाहणे आवश्यक आहे. 

बार्शीचा मागील अनेक वर्षातील इतिहास पहिला तर लक्षात येईल की एकमेकांच्या विरोधातून एकदा सुरू झालेली राजकीय टीका टिप्पणी कधी वैक्याक्तिक पातळीला जाऊन पोहोचेल याचा हे सांगता येत नाही. यातूनच सार्वजनिक प्रश्नांसाह एकमेकांच्या वैयक्तिक तक्रारी करण्याचे प्रकार घडत होते. मात्र भगवंत मोहोत्सवात तालुक्यातील दोन प्रमुख नेत्यांच्या गळा भेटीमुळे मागील विस वर्षापासून राजकीय दृष्ट्या संवेदनशिल तर कधी कधी असंवेदनशिल बनलेल्या बार्शी तालुक्यातील राजकारण पुढील काळात सकारात्मक व केवळ विकासाचे असणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

बार्शी तालुक्यावर १९८५ सालापासून आमदर दिलीप सोपल यांचे वर्चस्व आहे. तर १९९६ पासून राजेंद्र राऊत यांचा राजकारणात उदय झाला व तेंव्हापासून प्रत्येक निवडणुकीत सोपल-विरुध्द राऊत असा सामना होऊ आहे. यांच्यात प्रत्येक निवडणुकीत काँटे की टक्कर असते. गावा गावात, गल्ली-बोळात प्रत्येक ठिकाणी सोपल-राऊत गट निर्माण झाले होते. त्यामुळे तालुक्यात कोणत्याही कोपऱ्यात कसलेही भांडण झाल्यास ते थेट या दोन नेत्यांपर्यंत पोहोचत होते. सततच्या अशाच वातावरणामुळे दोन नेत्यातील हे राजकीय भांडण हे वैयक्तीक पातळीवर येऊन ठेपले होते. सामाजिक प्रश्नाच्या तक्रारीसह वैयक्तिक तक्रारी वाढल्या होत्या. 

याच कारणाने दोन्ही नेते एका स्टेजवर येण्याचे देखील टाळत होते. जर स्टेजवर आलेच तर एकमेकांकडे पाहत ही नव्हते इतकी कटुता निर्माण झाली होती. अलीकडील काळात राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडत होते. अनेक ठिकाणी हे नेते एका व्यासपीठावर येत होते. भाषणात एकमेकांचा नामोल्लेख करत होते. 

भगवंत मोहोत्सवात शेवटच्या दिवशी दिंडीच्या शुभारंभ आमदर दिलीप सोपल यांच्या हस्ते होता. तर हा संपूर्ण महोत्सव माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने ते ही उपस्थित होते. या दिंडीची जबाबदारी असलेल्या हभप जयवंत बोधले महाराजांच्या बाजूने दोन्ही नेते चालत होते. अचानक बोधले महाराजांनी दोन्ही नेत्यांना दिंडीत हातात हात घेऊन फुगडी खेळण्याचे सांगितले. सुरवातीला काहीसे अनउत्साही असलेल्या नेत्यांना बोधले महाराजांचा आग्रह नाकारता आला नाही. याच वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळा भेट घेतली. 

या भेटीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. या भेटी बद्दल कोण समर्थन करत आहे तर कोण टीका करत आहे. दोन्ही नेत्यांचा एकमेका विरोधातील राजकीय इतिहास पाहता या भेटीला फार महत्व आले आहे. या भेटी बद्दल राजकीय मत-मतांतर वेगळे असतील. पण या भेटी कडे राजकीय चष्म्यातून न पाहता केवळ दोन व्यक्तींची भेट म्हणून पाहणे गरजेचे आहे. मागील २०-२५ वर्ष तालुक्याचा कारभार करताना आरोप-प्रत्यारोप, तक्रारी यामुळे सतत ताण-तणावात या दोन व्यक्ती असतील. या भेटीने दोन व्यक्तीचा टोकाचा राग, एकमेकांच्या मनातील आनावश्यक द्वेष कमी करणे हीच श्री भगवंताची इच्छा असणार म्हणूनच भावंतांच्या समोर हभप जयवंत बोधले महाराजांच्या आग्रहाने शेकडो लोकांच्या समक्ष झालेली ही भेट भविष्यात बार्शीला एका चांगल्या वाळणाला घेऊन जाणारी ठरणारी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com